एक्स्प्लोर

धुळीचा (स्वच्छ) आवाज!!

तुझा कवितासंग्रह शनिवारी मिळाला आणि आत्ताच वाचून संपविला. असे बहुदा सगळ्याच कविता संग्रहाबाबत होत नाही. कविता वाचताना, एका बाजूने गतकालात जमा झालेल्या स्मृती आणि दुसऱ्या बाजूने, अटळपणे अंताकडे जाणारे भविष्य ( ते हेतुपूर्ण किंवा हेतुशून्य!! दोन्ही!!) या दोघांतील काळाच्या पोकळीला आकार देत आहेत, असे वाटले. अर्थात, वर्तमान जरूर आहे पण ते फार वेगळ्या स्वरुपात  मिळते.
"काल रात्री, स्वप्नात मी पाहिलं :
एक इवलं रोप
उमललं, सरसर वाढत उंच झालं;
मग फुटले त्याला दोन फाटे
गच्च हिरव्याकच्च पानांनी लहडलेले.
मी वेगाने छाटले त्याचे शेंडे
आणि फांद्यांना आवळून बांधल्या दोऱ्या.
मला जाग यायच्या आत…"
ही कविता तशी प्रातिनिधिक म्हणावी असा सगळा कविता संग्रह वाटला. सर्वसाधारणपणे कविता ही बरेचवेळा, आत्ममग्न आणि आत्मभान, अशा दोन्ही भावनांचे एकत्रीकरण असलेली रचना असते आणि ती तशीच असावी, असे मलातरी फार वाटते.
प्रत्येक कलावंताच्या कलाकृतीतून जाणवणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या व्यावहारिक व्यक्तिमत्वाशी  नेहमीच असतो. हे खरे असले, आणि विशेषत: एखाद्या कलावंताच्या सर्व कलाकृतीतून जरी भाववृत्तीतील विशिष्ठ अशा एखाद्या स्थायीभावाचा प्रत्यय येत राहिला तरीही त्याचा धांडोळा घेणे, तसे चुकीचे ठरू शकते. कविता वाचताना, आत्मनिष्ठतेचा प्रत्यय जरूर जाणवतो आणि तो देखील स्त्रीत्वाच्या अनुरोधाने घेतलेला!!
"आपण पाहत होतो :
आपल्या दोघांमधील जमिनीवरील अंतर;
आपल्या वेगळ्या जाती,
पाना-फुला-फळांचे वेगळे रंग-गंध;
वेगळे आकार, वेगळे उपयोग."
तसे बघितले तर साधी, सरळ शब्द रचना!! दोन जीवांचे हितगुज तरीही कवितेचा शेवट हा केवळ प्रेमीजनांचे कुजबुजणे न राहता, "गुंतली आहेत आपली मुळे, जमिनिखाली एकमेकांत इतकी खोल" अशी आत्ममग्न जाणीव करून देते.
कविता ही अशीच हवी, साध्या शब्दातून तरीही अत्यंत वेगळा अननुभूत अनुभव देणारी!! काही कवितेत अनुभव देखील विशिष्ट तऱ्हेने जाणवतात आणि त्याच अनुरोधाने काव्यरूप घेतात. म्हणूनच संवेदनविश्व कवितेत येते,ते प्रतिमा म्हणून!! जर का प्रतिक म्हणून आले असते तर त्यात थोडे अंतर पडले असते आणि मग कदाचित केवळ वैचारिक अनुभव म्हणून रचना गोठली गेली असती!!
त्याचबरोबर संवेदनानुभवातील उत्कटता हे, या कवितेच्या स्थायीभावातील अंगीभूत ताणांचे वेगळे लक्षण जाणवते. बहुतेक प्रतिमा या निसर्गातून घेतलेल्या लगेच जाणवतात तरीही पारंपारिक निसर्गचित्रे नसून त्यापलीकडील जाणीव कवितेतून सहज दिसते.
जीवनात आपल्याला अनेक अनुभव येतात आणि त्या अनुभवाचे संचित, त्या संचिताचे संवेदनाविश्व, काही जाणवलेले तर काही कल्पनेने उभारलेले असते. यांपैकी एखाद्या किंवा सगळ्याच एकत्रित मिश्रणाने झालेले संमिश्र अनुभव एकत्रितपणे भाववृत्ती दर्शवित असतात. त्यातून तयार  होणारी लय तसेच ताण हेच आपापत: कवितेत दृग्गोचर होताना दिसतात आणि तिथेच खरी कविता समृद्ध होते. " मी पाहिलं….", "सामावलेली","स्थलांतर" या काही वेचक कवितेतून आपल्याला वाचनाचा आनंद मिळतो आणि त्याचबरोबर आपल्या जाणीवा अधिक समृद्ध झाल्याचे लक्षात येते. हेच या काव्यसंग्रहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची  टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget