Yogini Ekadashi 2025 : योगिनी एकादशीला 'या' 5 वस्तूंचं करा दान; आर्थिक तंगी होईल दूर, भगवान विष्णू होतील प्रसन्न
Yogini Ekadashi 2025 : योगिनी एकादशीला दान-पुण्य करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, योगिनी एकादशीला दान केल्याने फार चांगलं फळ मिळतं.

Yogini Ekadashi 2025 : हिंदू धर्मानुसार, योगिनी एकादशीच्या (Yogini Ekadashi) व्रताला हिंदू धर्मात फार महत्त्वाचं आणि पूजनीय मानलं जातं. ही एकादशी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. त्यानुसार यंदा योगिनी एकादशी 21 जूनला साजरी करण्यात येणार आहे. तसेच, ही एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो.
योगिनी एकादशीला दान-पुण्य करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, योगिनी एकादशीला दान केल्याने फार चांगलं फळ मिळतं. या ठिकाणी अशा कोणत्या वस्तूंचं दान करावं ते जाणून घेऊयात.
अन्नदान
योगिनी एकादशीला अन्नदान करणं फार पुण्याचं मानलं जातं. या दिवशी गरजूंना तांदूळ, डाळ, गहू यांसारख्या वस्तू दान कराव्यात. यामुळे घरात कधीच अन्नाची कमतरता राहत नाही. तसेच, अन्नदेवता देखील प्रसन्न होते.
वस्त्रदान
या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करणं फार शुभ मानलं जातं. कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे घरात सुख-शांती टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
जलदान
या दिवशी जलदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही भांडी देखील दान करु शकता. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आणि कधीच धनहानी होणार नाही.
धन दान
आपल्या क्षमतेनुसार, या दिवशी तुम्ही धन दान करु शकता. याचं फार पुण्य फळ मिळतं. तसेच, आपल्याला कधीच आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही असं म्हणतात.
गायीला चारा खाऊ घाला
जर तु्म्हाला शक्य असल्यास या दिवशी तुम्ही गायीला चारा खाऊ घालू शकता. हिंदू धर्मानुसार, गाईची सेवा केल्यास पुण्य फळ मिळते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
दीप दान
देव्हाऱ्यात दिवा लावण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करु शकता. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते. तसेच, असं म्हणतात यामुळे तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















