Navratri 2022 : 'नऊ' हा अंक इतका विशेष का आहे? काय आहे या अंकाचं महत्त्व...
Shardiya Navratri 2022 Importance : भारतीय संस्कृतीत नऊ अंकाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
Shardiya Navratri 9 Ank Importance : भारतीय संस्कृतीत 'नऊ' या अंकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यात नऊ या अंकाला विशेष दर्जा देण्यात आला आहे. माणसाच्या जडणघडणीत नऊ हा अंक खूप प्रभाव पाडत असतो. जाणून घ्या 'नऊ' हा अंक इतका विशेष का आहे? काय आहे या अंकाचं महत्त्व...
- 'नवरात्र' हा एक शब्द दोन शब्दांनी मिळून बनवण्यात आला आहे. पहिला शब्द आहे 'नऊ' आणि दुसरा शब्द आहे 'रात्र'.
- 'नवरात्र' हा नऊ रात्रींचा उत्सव आहे. त्यामुळे हिंदू धर्मात 'नवरात्र' या सणाला विशेष महत्तव देण्यात आले आहे.
- ज्योतिष शास्त्रात नवग्रहांणा मान्यता देण्यात आली आहे.
- प्रत्येक ग्रह आणि दुर्गा देवीचा खास संबंध आहे.
- भौतिक ऊर्जादेखील नऊ आहेत. धर्मग्रंथानुसार, सृष्टीत असणारी भौतिक ऊर्जादेखील नऊ प्रकारांत मोडली आहे. यातील नववा प्रकार ग्रह-नक्षत्राचा आहे.
- ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची संख्यादेखील नऊ आहे.
- एक स्त्री गर्भधारणा करते आणि एका बाळाला जन्म देते. ही संपूर्ण प्रक्रियादेखील नऊ महिने चालते. म्हणूनच आईला देवीचे रुप असं म्हटलं जातं.
- जैविक सृष्टी आणि पृथ्वीचे स्वरुपदेखील नऊ प्रकारचं आहे. स्त्रीचे गुण, स्वभावदेखील नऊ आहेत. तसेच मानवाच्या मनाचे भावदेखील नऊ आहेत.
- माणसाच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या संख्यांमध्ये नऊ अंकाला विशेष महत्त्व आहे.
सुख, सौभाग्य आणि समृद्धी मिळवून देणारी नवरात्र!
भगवती आदीशक्तीच्या प्रार्थनेने आणि कृपेने भक्तांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवता येतो. यासोबतच तुम्हाला सुख, सौभाग्य आणि समृद्धीही मिळते. म्हणून, भक्त त्याच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची अत्यंत प्रामाणिकपणे पूजा करतात. कन्यापूजा, हवन-विधी, घटस्थापना हे विशेषत: नवरात्रीच्या दिवसांत फलदायी ठरतात.
नवरात्रीच्या काळात गायत्री महामंत्राचे छोटे अनुष्ठान
नवरात्रीचे नऊ दिवस साधना करून शक्ती संचित केली जाते, नवरात्रीच्या काळात साधकाने गायत्री महामंत्राचे छोटे अनुष्ठान केले तर त्याचे जीवन पूर्ण होते आणि त्याच्या अनेक मनोकामनाही आपोआप पूर्ण होतात. नऊ दिवस 24,000 गायत्री महामंत्रांचा जप करतात, जर हा विधी काही नियमांचे पालन करून केला गेला तर माता गायत्री साधकाचे रक्षण करण्यासाठी दैवी संरक्षण कवच बनवते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या