Weekly Numerology Horoscope : सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी ठरणार लकी; करिअरमध्ये प्रगतीची संधी
Weekly Numerology Horoscope : सप्टेंबर महिना उद्यापासून सुरु होणार आहे. हा महिना प्रत्येक राशीनुसारच काही जन्मतारखेच्या लोकांसाठी खास असणार आहे.
Weekly Numerology Horoscope 02 To 08 September 2024 : सप्टेंबर महिना उद्यापासून सुरु होणार आहे. हा महिना प्रत्येक राशीनुसारच काही जन्मतारखेच्या (Mulank) लोकांसाठी खास असणार आहे. त्यानुसार नवीन आठवडा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी खास असणार आहे ते जाणून घेऊयात.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1,10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या लोकांसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, तुमच्या आयुष्यात आनंद असेल. जे लोक सरकारी नोकरी करतायत त्यांना या आठवड्यात नवीन संधी मिळेल. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. फक्त रोज योग आणि ध्यान करा.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. पार्टनरबरोबर तुमचा संसार आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. मित्रांच्या साहाय्याने अनेक कामे सहज पूर्ण करता येतील.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात रोमान्स असेल. कामाच्या बाबतीत तुम्ही फार व्यस्त असाल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, नवीन आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. लव्ह लाईफ तुमची चांगली असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, नवीन आठवड्यात स्वत:ला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांचा विचार करु नका. स्वत:साठी निर्णय घ्या.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमचं लव्ह रिलेशन मजबूत होईल. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असाल. तसेच, तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. यासाठी रोज व्यायाम, योगासन, ध्यान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक