एक्स्प्लोर

Weekly Horoscope 28 August to 03 September 2023 : आजपासून सुरु होणारा आठवडा 'या' राशींसाठी खास, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक; साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 28 August to 03 September 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 28 August to 03 September 2023 : ऑगस्ट महिन्यातल्या पाचव्या आणि शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा अनेक राशीच्या लोकांसाठी खास आहे. तर, काही राशीच्या लोकांसाठी संघर्षाचा असणार आहे. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात संमिश्र जाणार आहे. या आठवड्यात आळस तुमच्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान, व्यवसायात प्रगती देखील थोडी मंद राहील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला सावधगिरीने व्यवहार करणं गरजेचं आहे. या काळात घाईगडबडीत किंवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी मित्रांचा किंवा कोणत्याही समजदार व्यक्तीचा सल्ला घ्या. आठवड्याच्या मध्यात नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला या काळात अत्यंत सावधगिरीने काम करावे लागेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात संघर्षाची असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला इतरांकडून दिशाभूल होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत वरिष्ठांशी नम्रपणे वागा. सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवा. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. आठवड्याच्या मध्यात, तुमचा बहुतेक वेळ कुटुंबीयांबरोबर चांगला जाईल. व्यवसायात प्रगतीची संधी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अविवाहित लोकांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात नवीन संधी मिळतील. जर तुम्ही नोकरीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला तुमचे करिअर पुढे नेण्याच्या चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. नोकरी करणार्‍यांना इच्छित ठिकाणी पदोन्नती किंवा बदली करता येईल. यामुळे तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. तुमची रखडलेली सर्व कामे तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून पूर्ण करू शकाल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात शुभ राहील. आज तुमची दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायाला पुढे नेण्याची संधी मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल. तुमच्या निर्णयाचे सर्वजण कौतुक करतील. आठवड्याच्या मध्यात अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते. घरातील शुभ कार्य पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत व्यवसाय वाढीसाठी हा काळ अतिशय शुभ आहे.  वैवाहिक जीवन आनंदी राहील.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच कोणावर विश्वास ठेवू नका. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. वेळेचा समतोल राखलात तर तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक समस्या सोडवताना वाणीवर नियंत्रण ठेवा. आठवड्याचा मध्यात थोडे चांगले दिवस येतील. या दरम्यान तुम्ही तुमचे काम सहज करू शकता. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळाल्याने मन प्रसन्न होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल.  

कन्या 

कन्या राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात संमिश्र राहील. कुटुंबाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या तुमच्या मानसिक त्रासाचे मोठे कारण बनेल. व्यावसायिकांसाठी आठवड्याचा मध्य हा उत्तम काळ आहे. व्यवसायात प्रगतीची संधी आहे. व्यवसायात नफा मिळाल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन थोडे चिंतेत राहू शकते. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात आव्हानात्मक असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक वेळा एकटेपणा जाणवेल. तुमची निर्णयशक्ती कमकुवत असल्याचे दिसून येईल. कोणतेही काम करताना तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत पहाल. अशा परिस्थितीत कोणताही मोठा निर्णय घेण्याऐवजी तो पुढे ढकलणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी तुमच्या चिंतेचे मोठे कारण बनू शकतात. रागाच्या भरात मोठे निर्णय घेणे टाळा. व्यवसायात नफा मिळवायचा असेल तर भविष्यात होणारे नुकसान लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कोणतेही काम करताना नीट विचार करून करा. वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. नोकरीत करत असलेल्या नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. ती अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करा. आठव्याच्या मध्यात तुमचे मन धार्मिक-सामाजिक कार्यात व्यस्त राहील. या दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेला जाऊ शकता. व्यवसायात लाभाच्या दृष्टीने वेळ अधिक शुभ आहे. 

धनु 

धनु राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात शुभ राहील. तुम्हाला नवीन रोजगाराच्या संधी मिळतील किंवा त्यात प्रगती करण्याच्या संधी मिळतील. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. आठवड्याच्या मध्यात प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकते. जे आधीपासून प्रेमसंबंधात आहेत, त्यांचे नाते अधिक घट्ट होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. 

मकर 

मकर राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात संमिश्र राहील. तुम्हाला विविध स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. जे राजकारणात करिअर करू इच्छितात त्यांनी कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. नोकरी शोधणाऱ्यांना आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात पैसे गुंतवताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या योजनांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या मध्यात सहकाऱ्यांची मदत न मिळाल्याने मन थोडे अस्वस्थ राहू शकते. अशा वेळी कोणतेही काम इतरांवर अवलंबून करू नका. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आठवड्याच्या मध्यात वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. व्यवसायात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडून आव्हानाचा असेल. कामानिमित्त लांब प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. आठवड्याच्या मध्यात घरात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत सहल किंवा एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी सहलीची शक्यता आहे. नोकरदारांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. जे लोक दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येतून जात होते, त्यांना खूप आराम मिळू शकतो. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 28 August 2023 : वृषभ, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget