Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना नवीन आठवड्यात बसणार मोठा धक्का; एकामागोमाग घडतील घटना, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 To 23 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 To 23 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कुंभ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात पार्टनरबरोबर सामंजस्याने वागणं गरजेचं आहे. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. अशा वेळी नात्याला महत्त्व द्या. अन्यथा दुरावा निर्माण होऊ शकतो.
करिअर (Career) - नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने येऊ शकतात, परंतु संयम ठेवा. व्यवसायात नवीन धोरण स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत काही संघर्ष आणेल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थिती अनुकूल कराल.
आरोग्य (Health) - शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. योग आणि ध्यान केल्याने आराम मिळेल. तसेच, कोणत्याही गोष्टीचा जास्त वेळ विचार करत बसू नका.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
कौटुंबिक जीवन (Family) - नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
करिअर (Career) - हा आठवडा नोकरीत स्थिरता राहील आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. मात्र, तुमच्या ध्येयावरुन तुमचं लक्ष हटता कामा नये.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि प्रगती दर्शवणारा आहे. जुन्या कामात यश मिळू शकते.
आरोग्य (Health) - या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात, त्यामुळे आहाराची काळजी घ्या. बाहेरचे तेलकट, तिखट अन्नपदार्थ खाऊ नका. तसेच, नियमित योग करणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















