Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जून महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 16 To 22 June 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 16 To 22 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात खास व्यक्तीशी तुमची भेट होईल. तसेच, कौटुंबिक वादाचा तुमच्या मनावर परिणाम होताना दिसेल. त्यामुळे मानसिक तणावापासून दूर राहा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा खास ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला पुण्य तर मिळेलच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक छोट्या-मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. तसेच, या दरम्यान तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक वृद्धी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही ज्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक कराल त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याबरोबर घडताना दिसतील. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सुख-समृद्धीत वाढ झालेली दिसेल. तसेच, जोडीदाराबरोबर चांगला ताळमेळ पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमचे आरोग्य सामान्य राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिन्याचा पहिला आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुमची देवाण-घेवाण वाढेल. तसेच, तुमच्या मार्गातील अडथळे हळुहळू दूर होतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमचं आरोग्य निरोगी राहील. फक्त तुमच्या शत्रूंपासून चार हात लांबच राहा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या कालावधीत तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तर, नवीन कार्याची सुरुवात करु शकता. या दरम्यान कोणाशीही उद्धटपणे वागू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदार वर्गातील लोकांची कामाची स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















