एक्स्प्लोर

Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : काही राशींसाठी नवीन आठवडा खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी पुढचा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरी बदली केल्यामुळे तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

नवीन आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. अभ्यासात तुमची रुची वाढेल. तसेच, भावा-बहि‍णींबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्यावर अचानक कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. तसेच, प्रॉपर्टीशी संबंधित तुमचे वाद लवकरच मिटू शकतात. तुमचे खर्च वाढत राहतील. तसेच, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचा व्यापार देखील चांगला चालेल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. जर तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे एक प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन राहील.या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं फार गरजेचं आहे. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वत:ला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्वीकारण्यासाठी तयार राहा. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करू नका. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांनी आपला वेळ कुठेही वाया घालू नये आणि नको त्या गोष्टींवर आपली शक्ती वाया घालवू नये. प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडा, कोणत्याही गोष्टीपासून पळ काढू नका. कोणताही निर्णय वेगाने घेऊ नका. प्रेमसंबंधात कडू-गोड भांडणं होतील.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. या आठवड्यात तुमच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असू शकतं. या आठवड्यात तुम्ही स्वतःवर पैसे खर्च करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. नोकरदारांना सहकाऱ्यांची साथ लाभेल.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा असेल. या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि बिझनेसशी संबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील, जे घेण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या मुलांना बढती मिळू शकते. तरुण मंडळी प्रियकरासोबत चांगला वेळ घालवतील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांची नियोजित कामं या आठवड्यात पूर्ण होतील, त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. मित्रांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या समस्या सोडवता येतील. जमीन आणि घराशी संबंधित वाद आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र राहील. या आठवड्यात तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपेल. तुमचे तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani 2024 : शनीवर पडली सूर्याची शुभ दृष्टी; 16 सप्टेंबरपासून 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, सुख-संपत्तीत होणार अमाप वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget