Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींसाठी नवीन आठवडा खर्चाचा; जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता? संयम ठेवा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 10 To 16 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 10 To 16 November 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आजपासून नोव्हेंबर (November 2025) महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला (10 ते 16 नोव्हेंबर 2025) सुरूवात झाली आहे, हा आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - धनु राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात, जोडीदाराशी बोलताना थोडं नम्रतेने बोला, अन्यथा जोडीदाराशी संवाद थांबू शकतो, विशेषतः जर दुसरी व्यक्ती गोंधळलेली असेल. आधार द्या एकमेकांना.
करिअर (Career) - कुंभ राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तर तुम्हाला या आठवड्यात कोणतेही ठोस परिणाम दिसणार नाहीत, परंतु तुम्ही नेटवर्किंग करण्याचा प्रयत्न करू शकता. बॉसकडून काही अप्रिय प्रतिक्रिया मिळू शकतात
आर्थिक स्थिती (Wealth) - आठवड्याच्या सुरुवातीला खर्च नियंत्रित केला जाईल, परंतु घरगुती वस्तूमुळे अचानक खर्च येऊ शकतो. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्यास उशीर होऊ शकतो.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात जे लोक पायऱ्या चढतात किंवा पायी प्रवास करतात त्यांना थकवा जाणवू शकतो. विशेषतः सकाळी सांधेदुखी कायम राहू शकते. तुमच्या आहारात कॅल्शियम आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. कोमट मीठ पाण्यात पाय भिजवल्याने आराम मिळेल.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मीन राशीच्या लोकांना भावनांपेक्षा समजून घेण्याची आवश्यकता असेल. जोडीदाराशी संबंध थोडे ताणले जाऊ शकतात. अविवाहितांसाठी, शनिवारी एखाद्या मित्राशी नवीन संभाषण सुरू होऊ शकते
करिअर (Career) - करिअरबाबत मोठे निर्णय घेण्यात विलंब किंवा गोंधळ होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना जुन्या अर्जांवर पाठपुरावा मिळू शकतो. टीम मीटिंगमध्ये तयारी अभावी नोकरी करणाऱ्यांना संकोच वाटू शकतो.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात अनावश्यक खर्चाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. मोबाईल फोन किंवा गॅझेट्सशी संबंधित अचानक खर्च येऊ शकतो. आर्थिक कागदपत्रांबाबत निष्काळजी राहू नका, जर तुम्ही अलीकडेच आर्थिक योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्याबद्दल शंका येऊ शकतात.
आरोग्य (Health) - मीन राशीचे लोकांना या आठवड्यात त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या येऊ शकतात. चेहऱ्यावर जळजळ किंवा पुरळ येण्याची लक्षणे जाणवू शकतात, म्हणून सौंदर्य उत्पादने काळजीपूर्वक निवडा. ताजी फळे खा आणि पाण्याचे सेवन वाढवा.
हेही वाचा
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा कसा जाणार? कोण होणार मालामाल? पैसा, प्रेम, करिअर? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















