Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा नशीब पालटणारा! कोण होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 1 To 7 December 2025: डिसेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? आर्थिक, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य वाचा.

Weekly Horoscope 1 To 7 December 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना December 2025) आणि डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु झाला आहे. हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवड्यात फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही संपूर्ण आठवडा आनंदी असाल. चंद्र आणि गुरु विद्यार्थ्यांना उत्तम यश देतील. मित्र व्यवसायात खूप मदत करतील. तुम्हाला आर्थिक फायदा होईल. बॅंक-बॅलेन्सही दुप्पट होईल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा आठवडा काही संघर्षाचा असेल, परंतु शेवटी तुम्ही विजयी व्हाल. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती होईल. या आठवड्यात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याच्या सुरुवातीला खूप शुभ परिणाम देईल. प्रत्येक प्रयत्नात प्रगती होईल. व्यवसाय पूर्वीपेक्षा चांगले होईल. नवीन व्यवसाय प्रकल्प किंवा भागीदारीचा प्रस्ताव येऊ शकतो. आरोग्य देखील चांगले राहील. तुम्हाला फायदाच फायदा होईल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी हा आठवडा अत्यंत खास असेल. काम आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. घर बांधणे किंवा खरेदी करण्याशी संबंधित एखादा मोठा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला राहणार आहे. नोकरीत मोठे यश मिळेल. तुम्ही तुमच्या घराशी संबंधित एक नवीन प्रकल्प सुरू करू शकता. गुरुवारनंतर, चंद्र मकर राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे प्रत्येक प्रयत्नात फायदा होईल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि निष्काळजीपणा टाळा. राजकारणात सहभागी असलेल्यांना चांगला नफा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.
हेही वाचा
Lucky Zodiac Signs: नवा महिना..नवा आठवडा..अखेर 5 राशींचे भाग्य उजळले! पॉवरफुल महापंचपुरूष योगानं स्वप्नपूर्ती होणार, पैसा, नोकरी, फ्लॅट....
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















