एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : कन्या राशीचं जीवन होणार समृद्ध; या आठवड्यात प्रगतीच्या अनेक संधी मिळणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Virgo Weekly Horoscope 24th To 30th March 2024 : कन्या राशीसाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. नोकरीत तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

Virgo Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : कन्या राशीसाठी नवीन आठवडा शुभ परिणाम घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्हाला या आठवड्यात आर्थिक तंगी जाणवणार नाही. मात्र, आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)

तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात बहरलेली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या. ज्यांच्या नुकताच ब्रेकअप झाला असेल त्यांनी भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीला आयुष्यात येऊ दिलं पाहिजे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे. मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.

कन्या राशीचे करिअर  (Virgo Career Horoscope)

नवीन आठवड्यात नोकरीत तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील, त्यामुळे कामासाठी सज्ज राहा. मिटींगमध्ये तुम्ही तुमची मतं मांडा, योजना सुचवा. हेल्थ केअर, बँकिंग, आयटी, डिझायनिंग, ऑटोमोबाईल आणि हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल्सना नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याच्या संधी मिळतील. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होईल. व्यावसायिक या आठवड्यात चांगला नफा कमवतील, तुम्ही एखादा नवीन जोड व्यवसाय देखील सुरू करू शकता. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

तुमचं आयुष्य या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. तुमच्या जीवनात समृद्धी येईल, म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता. तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात. कौटुंबिक कार्यक्रमासाठी तुम्ही पैसे बाजूला काढून ठेवावे.

कन्या राशीचे आरोग्य  (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही आजारातून बरे व्हाल. काही कुंभ राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या, घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री #abpमाझाWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget