Limbu Mirchi Totka : दर शनिवारी दाराबाहेर लिंबू मिरची का लावली जाते, श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा?
Limbu Mirchi Totka : लोकांचा असा विश्वास आहे की, लिंबू-मिरची टांगल्याने नकारात्मकता दूर होते. लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय आह हे आपण आज जाणून घेणार आहे.
Limbu Mirchi Totka : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की शनिवारी बाजारात, सिग्नलला लिंबू मिरची (Limbu Mirchi) विकताना पाहायला मिळते. कित्येक लोक त्यांच्या दुकानाच्या, वाहनांच्या आणि घराच्या गेटबाहेर लिंबू आणि मिरची टांगतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात, परंतु अनेकांचा यावर पूर्ण विश्वास आहे घर, दुकान आणि कारमध्ये लिंबू-मिरची लटकवल्याने अनेक समस्या मागे लागत नाहीत. काही लोक आपल्या भरभराटीसाठी (Vastu Tips) आणि विविध प्रकारच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी असं करतात. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, लिंबू-मिरची टांगल्याने नकारात्मकता दूर होते. लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण काय आह हे आपण आज जाणून घेणार आहे.
लिंबू मिरचीचा वापर अलक्ष्मी किंवा दुर्भाग्य दूर करण्यासाठी केला जातो. यामुळे वाईट नजर लागत नाही असे म्हटले जाते. तर या मागे वैज्ञानिक कारण देखील आहे. कॉटनच्या दोऱ्यात लिंबू आणि मिरची ओवल्याने त्यातील अॅसिड शोषलं जाते. तसेच लिंबू मिरची अधिका काळापर्यंत ताजे राहतात. ज्यामुळे कीट- पंतग दूर राहताता. तसेच वातावरण शुद्ध रहते. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो ज्योतिषशास्त्रात लिंबू-मिरचीची युक्ती खूप शक्तिशाली मानली जाते. असे म्हटले जाते की लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीची तिखटपणा लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवते.
लिंबू मिरची लटकवण्यामागे काय आहे शास्त्रीय कारण?
लिंबू आणि मिरची टांगल्याने एखाद्याची नजर प्रथम लिंबू मिरचीवर जाते आणि त्याची एकाग्रता बिघडली -जाते. यामुळेच बहुतेक लोक आपल्या घरी किंवा दुकानात लिंबू आणि मिरची लटकवतात. लिंबू आणि मिरची लटकवणे देखील वास्तुशास्त्रात महत्वाचे मानले जाते. लिंबू आणि मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असून ते दारावर टांगल्याने वातावरण शुद्ध राहते. हे नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून रोखते. तसेच आरोग्यासाठी लिंबू आणि मिरची आरोग्यासाठी खूप चांगली आहे. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन-सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. व्हायरल इन्फेक्शनपासून आपण वाचतो. लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते. जेव्हा ते दारावर टांगले जाते तेव्हा त्यांच्या उग्र वासामुळे डास, माश्या आणि बरेच कीटक घरात आणि दुकानात प्रवेश करत नाही.
वास्तूशास्त्रानुसार लिंबू मिरची लटकवणे का चांगले असते?
वास्तुशास्त्रानुसार देखील लिंबाला विशेष महत्त्व आहे. जेथे लिंबाचे झाड असते, त्याच्या सभोवतालची जागा पूर्णपणे शुद्ध असते. अशा वेळी ज्या घरात लिंबाचे झाड असते, ते घर पूर्ण शुद्ध मानले जाते. प्रत्येक घरात लिंबाचे झाड लावणे शक्य नसते म्हणून लोक घराच्या दारावर लिंबू-मिरची टांगतात. लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे वास्तू दोषही कमी होते असेही बोलले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचा उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये?