Vastu Tips : घराबाहेर लिंबाचं झाड लावणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय...
Vastu Tips : वास्तू शास्त्रानुसार, घराच्या बाहेर लिंबाचं झाड लावणं शुभ आहे की अशुभ? घराच्या बाहेर लिंबू लावावा की नाही? या संदर्भात प्रश्न पडतो.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येकाला आपलं घर सुंदर दिसावं, स्वच्छ, नीटनेटकं असावं अशी इच्छा असते. घराला अधिक सुंदर बनविण्यासाठी घराच्या आत आणि बाहेर देखील झाडं, रोपं लावली जातात. झाडं फक्त घराची शोभाच वाढवत नाहीत तर घरात सुख-शांती, सकारात्मक ऊर्जा आणतात. त्याचप्रमाणे, अनेकांना आपल्या घराच्या बाहेर लिंबाचं झाड लावायला आवडतं.
पण, वास्तू शास्त्रानुसार, घराच्या बाहेर लिंबाचं झाड लावणं शुभ आहे की अशुभ? घराच्या बाहेर लिंबू लावावा की नाही? या संदर्भात प्रश्न पडतो. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
लिंबाचं झाड लावण्याचा प्रभाव
वास्तू शास्त्रानुसार, लिंबाच्या झाडाला काटे असतात. यामध्ये असलेले काटे घरातील सुख-शांतीमध्ये अडथळा निर्माण करतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, कुटुंबियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्ही योजलेली कामे पूर्ण होणार नाही. तसेच, तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
घराच्या समोर लिंबाचं झाड लावावं?
वास्तू शास्त्रानुसार, जर तुम्हाला घराच्या बाहेर लिंबाचं झाड लावायचं असेल तर घराच्या आतमध्ये किंवा घराच्या समोर लावू नये. तुम्ही घराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला लिंबाचं झाड लावू शकता. तसेच, तुम्ही घरापासून दूरदेखील झाड लावू शकता. असे केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. तसेच, या लिंबूचा तुम्ही उन्हाळ्यात देखील चांगला वापर करु शकता.
घराच्या समोर हे झाड लावणं शुभ
वास्तू शास्त्रानुसार, घरातील सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही घराच्या मुख्य दारापाशी तुळस, अशोक किंवा नारळाचं झाड लावू शकता. हे झाड फक्त धार्मिक कार्यासाठीच शुभ मानले जात नाही तर त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील येते. या झाडांमुळे घरात लक्ष्मीदेखील आकर्षित होते. त्याचबरोबर घरात धनसंपत्ती देखील येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
