(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips For Women : आयुष्यात प्रगती आणि नवनवीन संधी हव्या असतील तर महिलांनी 'हे' उपाय फॉलो करा; प्रत्येक कामात मिळेल यश
Vastu Tips For Women : आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी अथक परिश्रम तर करावे लागतातच पण त्याचबरोबर काही उपायदेखील करावे लागतात.
Vastu Tips For Women : वास्तूशास्त्रात महिलांना (Women) घराची लक्ष्मी आणि देवीचं रूप म्हटलं गेलं आहे. महिलांमुळेच घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. असं म्हटलं जातं की, लग्नानंतर महिला ज्या घरात जातात त्या घराचं भाग्य उजळतं. एक काळ होता जेव्हा महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत होत्या. पण, आजचा काळ वेगळा आहे. महिला घराबाहेर पडूनसुद्धा संसारासाठी, घरखर्च चालविण्यासाठी आणि आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करण्यासाठी काम करतायत. घराच्या आर्थिक बाबतीतही महिलांचा सहभाग असतो.
पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आर्थिक बाबतीत सशक्त व्हायचंय. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी अथक परिश्रम तर करावे लागतातच पण त्याचबरोबर काही उपायदेखील करावे लागतात. यासाठीच वास्तुशास्त्रात (Vastu Tips) महिलांसाठी काही वास्तु उपाय सांगितले आहेत. यामुळे महिलांची आर्थिक वृद्धी होण्यास मदत होईल.
'अशी' असावी घराची वास्तू
- वास्तुशास्त्रानुसार, ज्या घराचं मुख्य द्वार किंवा बेडरूमचा गेट अग्निकोणमध्ये उघडतो. आणि घराच्या ब्रम्ह स्थानामध्ये अग्निकोणपेक्षा जास्त प्रकाश येत असेल तर अशा घरातील महिला जास्त प्रगती करतात. अशी घरं महिलांसाठी शुभ असतात.
- अग्निकोण उघडण्याबरोबरच ज्या घराची उत्तर दिशा जास्त उघडी असते. किंवा उत्तर दिशेला पाण्याचा टॅंक, बोरिंग बेसमेंट असतो अशा घरांत राहणाऱ्या महिला फार कमी कालावधीत यश आणि संपत्ती प्राप्त करतात.
- वास्तुशास्त्रानुसार, अग्निकोणात शुक्र ग्रहाचा निवास असतो असं म्हणतात. आणि शुक्र ग्रहाचा संबंध थेट महिलांशी असतो. यामुळेच घर तयार होत असताना घराचा अग्निकोण उघडा आहे ना या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर घराचा अग्निकोण उघडा नसेल तर त्या घरातील कोणतीच महिला प्रगती करू शकणार नाही.
प्रगतीसाठी महिलांनी 'हे' उपाय करावेत
- प्रगतीसाठी महिलांनी सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करावी. त्याचबरोबर तुळशीसमोर तुपाचा दिवा करून लावावा. यामुळे घरात सुख-शांती नांदते. तसेच, पैशांचीही कमतरता भासत नाही.
- रात्री झोपण्याआधी बेडरूममध्ये एका पेपरवर थोडंसं सैंधव मीठ ठेवा. आणि सकाळी गपचूप ते घराबाहेर फेकून द्यावे. यामुळे घरातील नकारात्कक ऊर्जा दूर होईल. तसेच, घरात सुख-शांती नांदेल. हा उपाय आठवड्यातून एक वेळा करा.
- महिलांनी रात्री झोपण्याआधी केस धुवू नयेत असं म्हटलं जातं. पण, त्याचबरोबर गुरुवारी देखील केस धुवू नयेत. यामुळे तुमची प्रगती थांबते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :