(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार 'ही' मूर्ती घरात ठेवा; आरोग्य राहील ठणठणीत, पैशांचीही होईल बरकत
Vastu Tips : वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले आहेत, ज्याचे काळजीपूर्वक पालन केल्यास व्यक्तीला संपत्ती प्राप्त होऊ शकते.
Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला (Vastu Shastra) विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर, वास्तुशास्त्रात दिशा देखील महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. घरातील एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे नकारात्मक परिणाम देखील घडतात. त्यामुळेच वास्तुनुसार, जर तुम्ही प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने ठेवल्यास तुम्हाला चांगला लाक्ष मिळू शकतो. आपण घराच्या सजावटीसाठी अनेक प्रकारच्या मूर्ती घरात ठेवतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या मूर्तीना वास्तुनुसार ठेवत असाल तर तुमचं आरोग्य तर चांगलं राहीलच पण तुम्हाला आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे.
'या' मूर्ती घरात ठेवल्याने धन-संपत्तीत होईल वाढ
'या' दिशेला ठेवा लक्ष्मीची मूर्ती
वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला फार शुभ मानलं जातं. कारण या दिशेला देव- देवतांचा वास असतो. अशा परिस्थितीत धनाची देवी मानली जाणारी लक्ष्मी देवीची मूर्ती जर तुम्ही घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवली तर तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. या शिवाय तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील.
तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल
वास्तुनुसार, जर तुम्ही तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर ते तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकतात. त्याचबरोबर बदकांच्या जोडीची मूर्ती घरात ठेवल्याने वैवाहिक जीवनात आनंद येऊन तुमचं वैवाहिक जीवन सुखी होते.
नकारात्मक ऊर्जा निघून जाईल
हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात असं म्हणतात. अशा स्थितीत कामधेनू गायीची पितळेची मूर्ती घरात ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
कासवाची मूर्ती या दिशेला ठेवावी
सनातन धर्मात कासवाचे विशेष महत्त्व आहे. कासव हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. कासव घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. त्याच वेळी, तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये धातूपासून बनवलेले कासव देखील ठेवू शकता. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही या मूर्ती घरात ठेवल्या तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर असेल आणि धन-धान्य संपत्तीच्या बाबतीतही तुम्ही परिपूर्ण असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :