एक्स्प्लोर

Vastu Tips: रात्री कोणीतरी गुपचूप पाहत असल्याचा भास होतो? वास्तुदोष की आणखी काही? 'या' 5 गोष्टी लगेच काढून टाका

Vastu Tips: घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास वास्तूदोषही कारणीभूत ठरू शकतात. खोलीत ठेवलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात? जाणून घेऊया...

Vastu Tips: अनेकदा जेव्हा आपण घरात येतो, तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटते, पण कधी कधी असे घडते की, त्याच घरात येताच काहीतरी वेगळेपण जाणवू लागते. अचानक प्रसन्नता हिरावून जाते. मन लागत नाही. अस्वस्थ वाटते. कधी कधी तर असे होते, जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीतरी गुप्तपणे आपल्यावर लक्ष ठेवून आहे किंवा कोणीतरी आपल्या पलंगावर फिरत आहे. रात्रीच्या वेळी असा भास होणे कदाचित सामान्य असेल, परंतु तुम्हाला नेहमीच असे वाटत असेल, तेव्हा समजून घ्या की नकारात्मकतेने घरात वावर केला आहे आणि आता तुम्हाला नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढण्याची नितांत गरज आहे. किंबहुना घरात नकारात्मक ऊर्जा येण्यास वास्तू दोषही कारणीभूत ठरू शकतात. जाणून घेऊया खोलीत ठेवलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात?

खोलीत पडलेल्या तुटलेल्या आणि विखुरलेल्या वस्तू वास्तू दोषाचे कारण?

अनेकदा घरात एखादे चित्र, शो पीस किंवा इतर कोणतीही वस्तू तुटली तर आपण त्याकडे लक्ष देत नाही. जर या गोष्टी खोलीत पडून राहिल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे या गोष्टी वेळीच काढून टाकणे तुमच्यासाठी चांगले राहील.

खोलीतील मृत कुटुंबीयांचे छायाचित्र हे देखील वास्तुदोषाचे कारण?

खोलीत मृत नातेवाईकांची छायाचित्रे ठेवू नयेत. तुम्ही हे फोटो ठेवा किंवा हॉलमध्ये किंवा तुम्ही झोपत नसलेल्या खोलीत भिंतीवर लटकवा. मृत नातेवाईकांचे फोटो बेडरूममध्ये ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. यामुळे तुम्हाला झोपायला भीती वाटू शकते.

खोलीत ठेवलेला रद्दी बॉक्स देखील वास्तुदोषाचे कारण?

जर तुम्ही घरातील निरुपयोगी वस्तू एका बॉक्समध्ये किंवा गोणीत गोळा करून रद्दी विक्रेत्याला विकण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी हाच बॉक्स खोलीच्या बाहेर किंवा स्टोअर रूममध्ये ठेवणे चांगले राहील. घरामध्ये रद्दी किंवा वापरात नसलेल्या वस्तूंमुळे वास्तुदोषाची समस्या उद्भवते.

दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्यानेही वास्तुदोष होऊ शकतो?

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्त्व आहे. उदाहरणार्थ, शुभ कार्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. त्याचबरोबर पैशाशी संबंधित बाबींसाठी उत्तर दिशा चांगली मानली जाते. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. झोपताना पाय कधीही दक्षिण दिशेला नसावेत. वास्तुदोष होण्याचे हे देखील एक कारण आहे.

थांबलेल्या घड्याळांमुळे वास्तुदोष होऊ शकतो?

तुमच्या खोलीत थांबलेली घड्याळे असल्यास, ही घड्याळे वेळेत खोलीतून काढून टाकणे किंवा त्यांची दुरुस्ती करून घेणे तुमच्यासाठी चांगले होईल. यामुळे तुमच्या घरातील वास्तू दोष दूर होतील. झोपण्याच्या खोलीत बंद घड्याळे ठेवू नयेत. विशेषत: तुमच्या घराच्या भिंतीवर थांबलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब काढून टाका.

हेही वाचा>>>

Vastu Tips: घरात सोने, चांदी, पैसे 'या' ठिकाणी ठेवा अन् कमाल बघा! दुप्पट होईल धन, मालामाल व्हाल, वास्तुशास्त्रात म्हटलंय...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget