एक्स्प्लोर

Vastu Tips : चुकूनही 'या' गोष्टी पर्समध्ये ठेवू नका, आर्थिक हानी होण्याची शक्यता, वास्तुशास्त्रात म्हटंलय...

Vastu Tips : अनेक वेळा खूप मेहनत करूनही फळ मिळत नाही. याचे कारण तुमच्या पर्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी असू शकतात. वास्तुमध्ये पर्सशी संबंधित काही नियम सांगितले आहेत.

Vastu Tips : वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) दिशांसोबतच घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे विशेष महत्त्व मानले जाते. वास्तूनुसार, एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती तो त्याच्या पर्समध्ये काय ठेवतो? यावर बरेच काही अवलंबून असते. वास्तूमध्ये पर्सशी संबंधित काही खास नियमही करण्यात आले आहेत. यानुसार ठेवलेल्या काही गोष्टी तुमच्या आर्थिक संकटाला कारणीभूत ठरू शकतात. जाणून घ्या पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत.

 

वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण बनतात
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. आम्ही तुम्हाला असे काही वास्तू दोष सांगणार आहोत जेणेकरुन तुम्ही ते तपासून दूर करू शकता.


चुकूनही या गोष्टी पर्समध्ये ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार चुकूनही पर्समध्ये जुने बिल ठेवू नये. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. पर्समध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मी नाराज होते. पर्समध्ये ठेवलेला जुना कागद हळूहळू कचरा होऊ लागतो. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये टाकाऊ कागद ठेवल्याने पैसे पर्समध्ये राहत नाही. पर्समध्ये ठेवलेल्या अनावश्यक बिलांमुळे आर्थिक संकट निर्माण होते.

 

जिवंत किंवा मृत व्यक्तीचा फोटो
पर्समध्ये कधीही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा फोटो ठेवू नये. वास्तूनुसार पर्समध्ये कोणत्याही देवतेचे चित्र कधीही ठेवू नये. अशी चित्रे पर्समध्ये ठेवणे अशुभ मानले जाते, असे केल्याने व्यक्तीचे कर्ज वाढते आणि वास्तुदोष होतात. पर्समध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.

 

पैशांची घडी
पर्समध्ये पैसे कसेही ठेवू नये. पर्समध्ये पैसे व्यवस्थित ठेवणे केव्हाही चांगले. पैशांची घडी करून पर्समध्ये ठेवल्याने वास्तुदोष होतात आणि आर्थिक संकट ओढवते. नोटा आणि नाणी कधीही पर्समध्ये एकत्र ठेवू नयेत. पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवा.

 

चाव्या
वास्तुशास्त्रानुसार चाव्या कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चाव्या ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात गरिबी येते. त्यामुळे चुकूनही चाव्या पर्समध्ये ठेवू नका. चावी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते.

 

फाटलेली नोट

वास्तुशास्त्रानुसार फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. तुमच्या पर्समध्ये आधीच फाटलेली नोट असेल तर ती बदलून घ्या. फाटलेली पर्स देखील वापरू नये. फाटलेली पर्स ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते.

 

उधार घेतलेले पैसे

वास्तूनुसार, उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. असे मानले जाते की, उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवादरम्यान 'या' शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Ast 2026: आज 29 ऑक्टोबरपासून 5 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! शुक्र अस्त अवस्थेतून बाहेर, करिअर, पैसा, प्रेमात गोल्डन टाईम! ज्योतिषशास्त्र
आज 29 ऑक्टोबरपासून 5 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! शुक्र अस्त अवस्थेतून बाहेर, करिअर, पैसा, प्रेमात गोल्डन टाईम! ज्योतिषशास्त्र
November 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...नोव्हेंबर महिना आयुष्याचा गेम पालटणार, 5 राशींना धनलाभाचे बक्कळ योग, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...नोव्हेंबर महिना आयुष्याचा गेम पालटणार, 5 राशींना धनलाभाचे बक्कळ योग, मासिक राशीभविष्य
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! चंद्रोदय वेळ, पूजेचा शुभ मुहूर्त, उपवास कधी सोडावा? 5 राशी भाग्यशाली, महत्त्व...
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! चंद्रोदय वेळ, पूजेचा शुभ मुहूर्त, उपवास कधी सोडावा? 5 राशी भाग्यशाली, महत्त्व...
Horoscope Today 29 October 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Embed widget