(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Valentine Day 2023 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार जन्मपत्रिकेत 'असे' बनतात प्रेमाचे योग! 'या' ग्रहांची असते महत्वाची भूमिका, जाणून घ्या
Valentine Day 2023 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि त्यांची स्थिती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. जन्मपत्रिकेत कसा प्रेमयोग तयार होतो? जाणून घ्या
Valentine Day 2023 Astrology : ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांच्या स्थितीचे महत्त्व सांगितले आहे. पत्रिकेतील ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनात बदल घडून येतात. यामुळे व्यक्तीच्या पत्रिकेत आर्थिक, सामाजिक स्थिती तसेच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात बदल झाल्याशिवाय राहत नाही. जन्मपत्रिकेत ग्रहांच्या स्थितीमुळे त्यांच्या प्रेम जीवनावरही (Valentine Day 2023) परिणाम होतो. हा प्रेमयोग कसा तयार होतो? जाणून घ्या
प्रेम तुमच्या नशिबात आहे की नाही?
जेव्हा कुंडलीत प्रेम योग असतो तेव्हा लोकांना प्रेम मिळते, परंतु जेव्हा कुंडलीत प्रेम योग नसतो किंवा ग्रहांची स्थिती कमकुवत असते, तेव्हा अशा लोकांना प्रेम करणे कठीण होते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती सांगते की, प्रेम तुमच्या नशिबात आहे की नाही. चला जाणून घेऊया कुंडलीतील कोणते घटक आहेत जे प्रेम योग दर्शवतात.
प्रेमविवाहाचा योग कसा तयार होतो?
अनेकांना आयुष्यात प्रेमविवाह करण्याची इच्छा असते, पण काही यशस्वी होतात तर काहींना त्यांच्या प्रेमविवाहात अडथळे येतात. कधीकधी जन्मपत्रिकेत असे योग असतात. ज्याला प्रेमविवाह योग म्हणतात. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा स्त्री, पती-पत्नी, भोग आणि प्रेमसंबंधांचा कारक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार प्रेम मिळवण्यासाठी पत्रिकेत शुक्राची स्थिती चांगली असायला हवी कारण प्रेम मिळवण्यात शुक्र, चंद्र आणि मंगळाचे महत्त्वाचे योगदान असते. जन्मपत्रिकेत या तिन्ही ग्रहांची स्थिती खूप चांगली असेल, तेव्हाच प्रेम मिळते. अशा स्थितीत
जाणून घ्या जन्मपत्रिकेत प्रेमविवाहाचा योग कधी तयार होतो?
-ज्योतिष शास्त्रानुसार प्रेमविवाहाचा योग तेव्हा बनतो. जेव्हा मंगळ राहू किंवा शनि एकत्र येत असतो.
-जेव्हा राहू, शुक्र किंवा शनि व्यक्तीच्या पत्रिकेत सातव्या घरात असतो, तेव्हा प्रेमविवाह होतो.
-जन्मपत्रिकेत शुक्र आणि मंगळाचा योग असल्यास किंवा या दोन ग्रहांमध्ये संबंध असल्यास प्रेम योग तयार होतो आणि तुमच्या जीवनात प्रेम फुलते.
-राहु आणि केतू हे दोन्ही जन्मपत्रिकेतील पाचव्या घरात असताना. मग प्रेमविवाह शक्य आहे.
-जन्मपत्रिकेत शुक्र किंवा चंद्र पंचम किंवा नवव्या स्थानावर असल्यास प्रेमविवाह होतो.
-जेव्हा कुंडलीत पाचव्या आणि सातव्या घरातील स्वामी एकत्र येतात, तेव्हा ग्रहांची ही दशा प्रेम जीवनासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करते.
ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग नाही त्यांनी खालील उपाय करावेत.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहासाठी तीन महिन्यांपर्यंत दर गुरुवारी कोणत्याही मंदिरात जाऊन अन्नदान करावे. त्यामुळे लवकरच प्रेमविवाह होण्याची शक्यता निर्माण होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Astrology Tips For Happy Married Life: पती-पत्नीमध्ये वारंवार वाद, आजपासूनच हा उपाय करा, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...