Trigrahi Yog : 8 मे ला मीन राशीत होणार ग्रहांचा 'महासंगम'; 'या' राशींना मिळणार सावधानतेचा इशारा, तुमची एकही चूक पडू शकते भारी
Trigrahi Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल ठराविक वेळेनुसार बदलत असते. यामुळे चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग निर्माण होणार आहे.

Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीत ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. मीन राशीत सध्या शुक्र, शनी, राहू, बुध ग्रह विराजमान आहेत. मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे 8 मे रोजी मीन राशीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. तर, 8 मे रोजी कोणकोणत्या ग्रहांची युती होणार आहे ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल ठराविक वेळेनुसार बदलत असते. यामुळे चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, 8 मे चा दिवस विशेष महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी मीन राशीत शनी, राहू, शुक्र ग्रह एकत्र निर्माण होणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी, शुक्र आणि राहूच्य़ा युतीचा काळ आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, पैसे कमावण्यासाठी तुम्हाला अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ देखील येऊ शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहू, शनी आणि शुक्र ग्रहाची युती काहीशा प्रमाणात कठीण ठरु शकते. या दरम्यान तुम्हाला पैसे कमावण्यात काही अडचणी येऊ शकतात. तसेच, तुमच्या नोकरी-व्यवसायावरही याचा परिणाम जाणवू शकतो. तसेच, पैशांचे निर्णय घेताना सावधानता बाळगा. घरातील ज्येष्ठांचं मत विचारात घ्या.
धनु रास (Sagittarius Horoscope)
या दरम्यान धनु राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, चांगली नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. या दरम्यान कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांची युती फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. तसेच, या काळात कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. कोणत्याही कामासाठी विनाकारण घराच्या बाहेर पडू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















