Samsaptak Yog : उद्या बनतोय समसप्तक योग; मेषसह 'या' 5 राशींसाठी ठरणार फलदायी
Auspicious Yog on 23 January : उद्या, म्हणजेच 23 जानेवारीला ऐंद्र योग, रवि योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे मेष आणि कर्क राशीसह इतर 5 राशींसाठी शुभ ठरणार आहेत.
Samsaptak Yog : उद्या, मंगळवार, 23 जानेवारीला चंद्र मिथुन राशीत भ्रमण करत असेल. त्याच प्रमाणे, उद्या मंगळ आणि चंद्राच्या समसप्तक योगामुळे लक्ष्मी योगही तयार होत आहे. याशिवाय उद्या पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी ऐंद्र योग, रवियोग आणि अर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने उद्याचं महत्त्व वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मेषसह 5 राशीच्या लोकांना उद्या तयार होत असलेल्या शुभ योगांचा लाभ होणार आहे. या राशींना धनप्राप्ती होण्याची विशेष शक्यता आहे आणि त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून आवश्यक सहकार्य देखील मिळेल. या 5 भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा, म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस लाभदायक आहे. मेष राशीच्या लोकांच्या कामात येणारे अडथळे उद्या दूर होतील. नवीन भाषा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा वाढेल. तुम्ही तुमच्या प्रियकराला समजून घ्याल आणि दोघांमध्ये समन्वय निर्माण होईल. काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने अपूर्ण सरकारी कामं नजीकच्या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी उद्या, म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि तुम्ही योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकाल. नोकरदारांना उद्या अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे, या संधी मिळाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात, त्यामध्ये त्यांना चांगल्या नफा मिळेल. उद्या तुम्हाला कामात उत्साह जाणवेल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उद्याचा, म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस लाभदायक ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना उद्या धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून आवश्यक सहकार्य मिळेल. तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल आणि जुन्या समस्याही संपतील. मंगळाच्या कृपेने तुमचा कामाचा उत्साह कायम राहील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सहकार्य राहील आणि घरगुती वातावरणात सुख-शांती अनुभवायला मिळेल. नोकरदार लोक उद्या आपले काम आनंदाने पूर्ण करतील आणि सहकाऱ्यांचीही मदत तुम्हाला मिळेल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर उद्या तुम्हाला आराम मिळेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी उद्याचा, म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस चांगला असणार आहे. मकर राशीच्या लोकांना उद्या जीवनातील सर्व सुखसोयींचा आनंद मिळेल आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅनही असेल. नियोजनबद्ध काम केल्याने तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचा सोशल सर्कलही वाढेल. गुंतवणुकीत चांगला नफा मिळेल आणि आर्थिक बाबतीतही प्रगती होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे उद्या पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला कायदेशीर बाबीतूनही दिलासा मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा, म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल, त्यामुळे मानसिक शांती मिळेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकाल. व्यवसायाच्या दृष्टीने उद्याचा दिवस चांगला असेल, तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या नोकरीसाठी मुलाखतीस जात असाल तर यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला मित्र आणि जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Ayodhya Ram Mandir : शरीरालाच मंदिर बनवतात 'या' सांप्रदायाचे लोक; अंगभर गोंदून घेतात 'राम' नाम