Mercury Transit 2022 : 'या' राशींसाठी येणार 'चांगली वेळ', 25 एप्रिलपासून बदलणार नशीब
Mercury Transit 2022 : 25 एप्रिल रोजी बुध मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि शुक्र एकत्र आल्यावर एक अतिशय शुभ योग तयार होतो.
Mercury Transit 2022 : बुध सध्या मेष राशीत भ्रमण करत आहे. 25 एप्रिल रोजी बुध मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि शुक्र एकत्र आल्यावर एक अतिशय शुभ योग तयार होतो. त्याला लक्ष्मी नारायण योग म्हटले जाते. सध्या बुध अशुभ ग्रह राहूच्या संपर्कात आहे, त्यामुळे तो पूर्ण लाभ देऊ शकत नाही. राशीत बदल होताच बुध ग्रहाची शुभता वाढेल.
वृषभ राशीमध्ये बुधाचे संक्रमण
वृषभ राशीत बुधाचे संक्रमण पंचांगानुसार 25 एप्रिल 2022 रोजी पहाटे पाच वाजता होईल. बुधाने राशी बदलताच या राशींचे नशीब उजळेल.
मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुधाचा हा बदल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमच्यासाठी कुंडलीच्या पहिल्या आणि चौथ्या घराचा स्वामी बुध आहे. आता 12 व्या घरात बुधाचे संक्रमण होणार आहे. कुंडलीचे 12वे घर हा खर्चाचा आणि परदेशाचाही कारक मानला जातो. 12 व्या घरातील शुक्र हा विलासी जीवनाचा दाता मानला जातो. या काळात तुमचा आनंद वाढू शकतो. पैशाशी संबंधित समस्या दूर होणार नाहीत, परंतु पैशाशी संबंधित कामे देखील थांबणार नाही. या काळात तुम्ही महागडे फोन, गॅजेट्स इत्यादी खरेदी करण्याचा विचार करू शकता.
कन्या : बुधाचा राशी बदल तुमच्यासाठी खास असणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. जो तुमच्या कुंडलीच्या पहिल्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. बुधाचे संक्रमण तुम्हाला नोकरीत बढती घेऊन येत आहे. यावेळी कार्यालयात तुमचे शत्रू सक्रिय असू शकतात. संयम आणि चिकाटी ठेवा. वादविवादांपासून दूर राहा. तुमचे काम इतरांच्या लक्षात येईल. त्यामुळे चुकायला जागा सोडू नका. टूरची योजना आखू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागेल. बुधाचे संक्रमण प्रेमसंबंधांसाठी शुभ परिणाम देऊ शकते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)