Taurus Horoscope Today 16 April 2023 : वृषभ राशीच्या लोकांनी निर्णय घेताना विचार करा; वाचा आजचं राशीभविष्य
Taurus Horoscope Today 16 April 2023 : आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी संमिश्र असेल, तसेच आज तुम्हाला यश मिळण्याबाबत शंका आहे.
Taurus Horoscope Today 16 April 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. विवाहित लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात (Married Life) आनंदी दिसतील, परंतु दुसर्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात. आज नोकरीत (Job) बढतीचा दिवस आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. थांबलेले पैसे येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर बरे होईल. कला (Art) आणि संगीतात (Music) रुची असू शकते. कुटुंबातील (Family) सदस्यांच्या गरजा लक्षात ठेवा. खर्च जास्त राहील, पण रोजचे उत्पन्न चांगले राहील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.
कोणतेही नवीन निर्णय घेऊ नका
वृषभ राशीचा (Taurus Horoscope) आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी संमिश्र असेल, तसेच आज तुम्हाला यश मिळण्याबाबत शंका आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत आज कोणताही नवीन प्रयोग करू नका. कोणतेही नवीन निर्णय घेऊ नका. कारण आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होणार नाहीत. आज तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला कुठूनही नोकरीची ऑफर आली तर आधी सर्व माहिती जाणून घ्या, मगच नोकरी स्वीकारा. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैशांचे व्यवहार टाळावे लागतील. कोणालाही कर्ज देऊ नका. गुंतवणूक करण्याआधी मित्राचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सल्ला घ्या.
आज वृषभ राशीचे आरोग्य
आज तुम्हाला डोकेदुखी तसेच पचनाशी संबंधित समस्या जाणवतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
वृषभ राशीच्या लोकांनी गायीला पालक खाऊ घालावा. देवाला हरभरा डाळ आणि गूळ प्रसाद म्हणून अर्पण करावा.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :