एक्स्प्लोर

Swami Samartha : स्वामी समर्थांचा फोटो देवघराच्या आत का ठेवू नये? गुरु आणि देव तत्त्वात काय फरक असतो?

Swami Samartha : स्वामी समर्थांचा फोटो देवघरात का ठेवू नये? जाणून घ्या यामागचं कारण; धार्मिक मान्यतेनुसार 'हे' नियम पाळणं महत्त्वाचं!

Swami Samartha : श्री स्वामी समर्थ (Swami Samartha) महाराज हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' या त्यांच्या अभयवचनामुळे अनेक भक्तांना मानसिक आधार मिळतो. त्यामुळे अनेकांच्या घरात स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो पाहायला मिळतो. काही जण स्वामींचा फोटो देवघरात ठेवतात, तर काही जण तो देवघरात ठेवू नये, अशी मान्यता असल्याचं सांगतात. पण खरंच स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवणं अयोग्य आहे का? यामागे नेमकं काय कारण आहे? या संदर्भात ज्योतिष आणि वास्तूशास्त्राच्या अभ्यासक अश्विनी यांनी माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवू नये, असं का म्हणतात?

काही वास्तुशास्त्रीय मान्यतांनुसार, घरातील देवघर हे देवी-देवतांच्या नियमित पूजेसाठी असलेलं पवित्र स्थान मानलं जातं. त्यामुळे देवघरात कोणत्या प्रतिमा ठेवाव्यात, याबाबत काही विशिष्ट परंपरा पाळल्या जातात. काही ठिकाणी साधू-संत आणि गुरूंचे फोटो मुख्य देव्हाऱ्यात न ठेवता स्वतंत्र जागी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

स्वामी हे गुरु आहेत. त्यामुळे त्यांचं गुरुतत्व तुमच्यामध्ये आहे. आणि जे देवघर आहे त्यामध्ये दैवतत्व आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गुरुंचा फोटो मंदिरात देवांच्या बरोबर ठेवू नये. कित्येक लोक आहेत जे फक्त स्वामींची पूजा करतात. त्यांनी देवाच्या ठिकाणी देव न ठेवता फक्त स्वामींचा फोटो ठेवला तर चालेल. पण देव आणि गुरु या दोन्हींचा फोटो एकत्र ठेवायचा नाही. 

यामागे अशी धारणा आहे की, देवघरात कुलदैवत, इष्टदेवता आणि नियमित पूजा केल्या जाणाऱ्या देवी-देवतांच्या प्रतिमांना प्राधान्य द्यावं. तर गुरू किंवा संतांची प्रतिमा घरातील स्वतंत्र स्वच्छ आणि पवित्र जागी ठेवून त्यांचं स्मरण, ध्यान आणि पूजन करावं. मात्र, ही एक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यता आहे. स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवू नये, असा कोणताही धार्मिक नियम असल्याचे ठोस प्रमाण उपलब्ध नाही.

स्वामी समर्थांचा फोटो कुठे ठेवावा?

जर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो देवघरात न ठेवता स्वतंत्र जागी ठेवायचा असेल, तर

  • घरातील स्वच्छ आणि शांत जागेची निवड करू शकता.
  • स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ आणि उंच जागी ठेवावा.
  • फोटोच्या आसपास अस्वच्छता किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नयेत.
  • स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून मनोभावे प्रार्थना करू शकता.
  • फोटो खराब झालेला, तुटलेला किंवा धुळीने माखलेला ठेवू नये.

प्रत्येक कुटुंबाची पूजा पद्धती, श्रद्धा आणि परंपरा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि कुटुंबाची धार्मिक परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. स्वामी समर्थांचा फोटो देवघरात ठेवू नये, ही काही ठिकाणी प्रचलित असलेली मान्यता आहे; मात्र तो ठेवल्याने दोष निर्माण होतो, असं निश्चितपणे म्हणता येत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :   

Hindu Religion : जगातील एकमेव मंदिर! जिथे चक्क देवही सोडून जातात; अंत्यसंस्काराची परंपरा ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kartiki Ekadashi 2026: चातुर्मास संपणार..भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होणार..शुभ कार्यांना सुरूवात! कार्तिकी एकादशी कधी? भगवंतांच्या निद्रामागील पौराणिक रहस्य, महत्त्व..
चातुर्मास संपणार..भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होणार..शुभ कार्यांना सुरूवात! कार्तिकी एकादशी कधी? भगवंतांच्या निद्रामागील पौराणिक रहस्य, महत्त्व..
Swami Samartha : स्वामी समर्थांचा फोटो देवघराच्या आत का ठेवू नये? गुरु आणि देव तत्त्वात काय फरक असतो?
स्वामी समर्थांचा फोटो देवघराच्या आत का ठेवू नये? गुरु आणि देव तत्त्वात काय फरक असतो?
Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Kumbh Mela 2027: 2027 या एकाच वर्षात 2 कुंभमेळ्यांचा योग! नाशिकमध्ये सिंहस्थ, तर 'या' ठिकाणी अर्धकुंभ; महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या...
2027 या एकाच वर्षात 2 कुंभमेळ्यांचा योग! नाशिकमध्ये सिंहस्थ, तर 'या' ठिकाणी अर्धकुंभ; महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या...
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
Embed widget