Surya Shani Yuti: 14 जानेवारीनंतर 'या' राशींची चांदीच चांदी! महायोगांमुळे नशीब फळफळणार? नोकरी, पैसा, विवाह, घर, चांगले दिवस येणार
Surya Shani Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिला कर्माचा दाता म्हटले जाते आणि सूर्याशी संयोग झाला की चांगल्या कर्मांचे फळ मिळते, महायुतीमुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत
Surya Shani Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह-ताऱ्यांचे वेगळे महत्त्व आहे. या ग्रहांच्या हालचालीचा आपल्या जीवनावर खोल परिणाम दिसतो. काही ग्रहांचा संयोग आपल्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येतो, तर काही वेळेस अडचणी.. तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. परंतु यावेळी कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याच्या युतीमुळे काही लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सुख-समृद्धी, समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांनी काम केल्यास बढती मिळण्याची शक्यता आहे.
शनि कर्माचा दाता..!
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार शनिला कर्माचा दाता म्हटले जाते आणि सूर्याशी संयोग झाला की चांगल्या कर्मांचे फळ मिळते आणि आदर वाढू लागतो. त्यांच्याद्वारे तयार झालेल्या संयोगाचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव पडतो. हा देखील सुवर्णकाळ ठरतो असे म्हणता येईल. या दोघांचा महायोग तयार होत असल्यामुळे अमाप पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल, शनि आणि सूर्य जवळ येताच या राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील. 2025 मध्ये सूर्य आणि शनीचा संयोग कधी होईल आणि कोणत्या राशींना त्याचा फायदा होईल हे जाणून घेऊया.
2025 मध्ये शनि आणि सूर्याची युती कधी होईल?
ज्योतिषशास्त्रात, शनी हा सर्वात संथ म्हणजेच हळू चालणारा ग्रह आहे. शनीची राशी दर अडीच वर्षांनी बदलते. सध्या शनि त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत स्थित आहे. ग्रहांचा राजा सूर्य देव दर 30 दिवसांनी आपली राशी बदलतो. अशा स्थितीत 14 जानेवारीनंतर जेव्हा ते 12 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा त्या दिवशी शनि आणि सूर्याचा संयोग होईल.
बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी, सूर्य रात्री 10:03 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल.
सिंह राशीवर सूर्य-शनि युतीचा प्रभाव- कामे आता मार्गी लागतील
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीत, हा संयोग सप्तम भावात होईल, ज्यामुळे अपार यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागतील. जर तुम्ही व्यापारी असाल तर नफा कमावण्याची वेळ येईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन राशीवर सूर्य-शनि युतीचा प्रभाव - प्रत्येक कामात यश मिळेल
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या नवव्या घरात हा संयोग होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित संधी मिळतील. पैसा मिळवण्याची वेळ आली आहे. 12 फेब्रुवारी नंतर, तुम्ही तुमचे काम एक महिना लक्ष केंद्रित करून करा, कारण तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात नशीब तुम्हाला खूप साथ देईल. तुमच्या आर्थिक परिस्थितीसोबतच तुमचे लव्ह लाईफ देखील खूप चांगले असणार आहे.
कन्या राशीवर सूर्य-शनि युतीचा प्रभाव - भाग्य सुधारणार
ज्योतिषशास्त्रानुसार, शुभ योग तयार होणार आहेत. ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित लाभ मिळतील. तुम्हाला नवीन नोकरी करायची असेल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. सूर्य-शनि युतीमुळे तुमचे भाग्य सुधारणार आहे.
हेही वाचा>>>
Vivah Muhurta 2025: कुंभमेळ्याच्या महायोगात लग्न करणे म्हणजे भाग्योदयच! विवाहासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ काळ दोन्हीही जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )