Surya Gochar 2024 : पुढचे 9 दिवस 'या' राशींच्या जीवनात घडतील मोठे बदल; नोकरीत प्रमोशनसह 'या' राशी राहतील धनवान
Surya Nakshatra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑगस्ट रोजी सूर्य शनीच्या नक्षत्रातून निघून बुध नक्षत्र अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Surya Nakshatra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रात, प्रत्येक ग्रहाचं आपलं वेगळं स्थान आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. तर, सूर्याला पिता, आत्मा, मान-सन्मान, सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. सूर्य ग्रह राशी परिवर्तन करण्याबरोबरच नक्षत्र परिवर्तन देखील करतात. त्यामुळे सर्व 12 राशींवर याचा परिणाम दिसून येतो. सूर्य ग्रह सध्या शनीच्या नक्षत्र पुष्यात विराजमान आहे. तर, 2 ऑगस्ट रोजी नक्षत्र परिवर्तन करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑगस्ट रोजी सूर्य शनीच्या नक्षत्रातून निघून बुध नक्षत्र अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
ऑगस्ट महिन्यात केव्हा होणार सूर्याचं संक्रमण?
हिंदू पंचांगानुसार, सूर्य 2 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी बुधाचं नक्षत्र अश्लेषामध्ये संक्रमण होणार आहे. तर, सूर्य 14 दिवसांपर्यंत याच नक्षत्रात विराजमान असणार आहे. 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपर्यंत ते याच नक्षत्रात असणार आहे. 27 नक्षत्रांमध्ये अश्लेषा हा नववा आणि सर्वात शक्तिशाली असा ग्रह आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सूर्याचं अश्लेषा नक्षत्रात परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांचा कल अध्यात्माच्या दिशेने असणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तुम्हाला व्यापारात देखील चांगला लाभ मिळू शकतो.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सहभाग लाभेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला यात्रेला देखील जावं लागू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूल राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र परिवर्तन चांगलं ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्नदेखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये चालत असेल तर त्याला अधिक चालना मिळेल. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: