Surya Gochar 2024 : अवघ्या काही तासांतच सूर्याचं तूळ राशीत संक्रमण; 'या' 4 राशींनी आत्तापासून राहा सावध, दुप्पट अडचणी वाढतील
Surya Gochar 2024 : अवघ्या काही तासांतच म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आपल्या नीच राशीत परिवर्तन करणार आहे.
Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. या राशी (Zodiac Signs) परिवर्तनाचा प्रभाव काही राशींवर शुभ होतो तर काही राशींवर अशुभ होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Sun) लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. याचा फार वाईट परिणाम 4 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
अवघ्या काही तासांतच म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आपल्या नीच राशीत परिवर्तन करणार आहे. याचा 4 राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्याच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती ढासळू शकते. तसेच, या काळात पैसे खर्च करताना सावधानता बाळगा. कुटुंबियांबद्दल तुम्हाला चिंता सतावेल. तसेच, या काळात कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या आधी 10 वेळा विचार करा. तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सूर्याच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या लोकांच्या कार्यावर प्रभाव पडू शकतो. तुमच्यावर कामाचा ताण अधिक वाढू शकतो. तसेच, जे लोक नोकरी करतायत त्यांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. तसेच, त्वचेशी संबंधित आजार तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
सूर्याच्या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांनी सावधानतेने राहण्याची गरज आहे. या काळात जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर अवश्य करु शकता. तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं.त्यामुळे पैसे खर्च करताना विचारपूर्वक करा. तसेच, कोणालाही पैसे देताना काळजीपूर्वक निर्णय घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
या काळात मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवनात वाद वाढू शकतात. यामुळे नात्यात दुरावाही येऊ शकतो. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :