Shukra Gochar 2025 : शुक्राचा उदय होताच पालटणार 3 राशींचं नशीब; मार्चपासून सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ
Shukra Gochar 2025 : शुक्राच्या संक्रमणामुळे मार्च महिन्यात मालव्य राजयोग तयार होणार आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं.
Shukra Gochar 2025 : धनदाता शुक्र ठराविक काळानंतर आपली रास बदलतो. काहीवेळा शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे विविध राजयोग तयार होतात. संपत्तीचा दाता शुक्राचा मार्चमध्ये आपल्या उच्च राशीत, म्हणजेच मीन राशीत उदय होईल, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. तसेच, या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कुंभ रास (Aquarius)
मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन गृहात प्रवेश करणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. विशेषत: मालमत्ता किंवा शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमची दूरदृष्टी आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचं कौतुक केलं जाईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकते. कारण तुमच्या चतुर्थ भावात शुक्राचं भ्रमण होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारी होण्याचीही शक्यता आहे. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल. त्याचबरोबर स्थावर मालमत्तेसंबंधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. यावेळी, तुमच्या आईशी तुमचं नातं चांगलं राहील.
वृषभ रास (Taurus)
मालव्य राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीतील उत्पन्नाच्या घरात शुक्राचं भ्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. नवीन नोकरी मिळू शकते. त्याच वेळी, तुम्ही काही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. बेटिंग, लॉटरी आणि शेअर्समध्ये अनपेक्षित आर्थिक नफा देखील होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. नवीन जबाबदाऱ्यांमुळे तुमची करिअरमध्ये प्रगती होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: