एक्स्प्लोर

Vastu Tips : काही केल्या पाकिटात पैसे टिकत नाहीत? कुठल्या चुका ठरतायत कारणीभूत? 'या' छोट्याशा उपायाने होईल पैशाची बरसात

Vastu Tips For Money : तुमचेही पाकिटात पैसे ठेवल्या ठेवल्या ते खर्च होतात आणि पर्स रिकामी होते का? या सततच्या समस्येला विराम देण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता, ज्यामुळे पैशांचा ओघ वाढू शकतो.

Vastu Tips For Money : आपल्यापैकी बराच जणांना हा अनुभव आला असेल की पाकिटात पैसे ठेवल्या ठेवल्या अगदी काही काळात ते गायब होतात. वास्तुशास्त्रात याच सगळ्या गोष्टींवर काही उपाय सांगितले गेले आहेत. तुमचं जीवन सुधारण्यासाठी, पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे एखाद्या व्यक्तीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. पाकिटाशी संबंधित देखील असे वास्तु उपाय आहेत, जे केल्यास पैशाचा ओघ वाढू शकतो. काही लोकांची पाकिटं फाटलेली असतात, तर काही लोक निरुपयोगी वस्तू पर्समध्ये ठेवतात, अशा लोकांना आर्थिकदृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आपल्या पर्सला नकारात्मक ऊर्जेपासून दूर कसं ठेवायचं? आणि संपत्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.

पाकिटाशी संबंधित प्रभावी उपाय

वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पर्समध्ये फाटलेल्या नोटा, फोटो किंवा खराब झालेले कागद ठेवले तर त्याच्या पर्समध्ये पैसे राहत नाहीत. पैशाची आवक कमी होऊ लागते. अशा स्थितीत, पर्स नेहमी स्वच्छ ठेवणं आणि पर्समधून अनावश्यक गोष्टी लवकरात लवकर काढून टाकणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पर्समध्ये लक्ष्मी मातेचा कागदी फोटो ठेवू शकता, पण फोटो खराब होऊ लागताच तो बदला. तुमची पर्स कधीही नोटांशिवाय ठेवू नका, रिकामी पर्स पैशांचा ओघ थांबवू शकते. 

पाकिटाशी संबंधित वास्तु टिप्स

  • पर्समध्ये नाणी आणि नोटा एकत्र ठेवू नका. पर्समध्ये फक्त नोटा ठेवा. तुम्ही नाणी दुसऱ्या खिशात ठेवू शकता. 
  • फाटलेली पर्स ताबडतोब स्वतःहून वापरणं थांबवा. 
  • पर्समध्ये नेहमी व्यवस्थित आणि खुल्या पद्धतीने पैसे ठेवा, फोल्ड केलेल्या नोटांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. 
  • तुम्ही तुमच्या पर्समध्ये श्रीयंत्र ठेवू शकता, जे देवी लक्ष्मीचं भौतिक रूप आहे.
  • तुमची पर्स नेहमी पैशाने भरलेली असेल याची खात्री करण्यासाठी त्यात तांदळाचे काही दाणे ठेवा.
  • तुमच्या पर्समध्ये कोणतेही जुने बिल ठेवू नका. 
  • पर्समध्ये लक्ष्मी शिवाय इतर कोणत्याही देवी-देवतांचे फोटो किंवा पूर्वजांचे फोटो ठेवू नका. 

हेही वाचा:

Maha Kumbh 2025 : कसं बनतात नागा साधू? कुंभमेळ्यानंतर हे साधू कुठे गायब होतात? जाणून घ्या रहस्यमय जीवन                                                     

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget