Shukra Gochar 2022 : शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, या राशींचे नशीब उघडणार
Shukra Gochar 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह उद्या म्हणजेच 27 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Shukra Gochar 2022 : ज्योतिषशास्त्रात गुरु आणि शुक्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. शुक्र हा धन आणि वैभवाचा ग्रह मानला जातो, तर गुरू हा ग्रह भाग्य वाढविणारा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह उद्या म्हणजेच 27 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. येथे शुक्राची गुरूशी भेट होणार आहे. त्याचा प्रभाव वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या संयोगामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उघणार आहे.
वृषभ : शुक्र-गुरु युतीच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहिल्याने शरीरात चपळता येईल. कौटुंबिक आनंद राहील. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. परंतु, प्रगती मिळविण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरू आणि शुक्राची भेट शुभ आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळू शकते. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना बढती-वाढ मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. मालमत्तेत लाभ होईल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल.
कर्क : या राशीच्या लोकांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुमच्या बुद्धी आणि विवेकाच्या मदतीने तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. ज्या कामात तुम्ही हात लावाल त्यात यश मिळेल. सहकाऱ्यांचे प्रेम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :