Shukra Gochar 2025 : 12 महिन्यांनंतर शुक्राचा होणार बुधाच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं भाग्य उजळणार, हातात पैसा खेळणार
Shukra Gochar 2025 : शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र, 3 राशींसाठी हे संक्रमण नशीब बदलणारं असणार आहे.

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र (Shukra) ग्रहाचं संक्रमण फार महत्त्वाचं मानलं जातं. कारण शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्याचा दाता मानला जातो. माहितीनुसार, 26 जुलै रोजी गुरु आणि शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र, 3 राशींसाठी हे संक्रमण नशीब बदलणारं असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन फार सकारात्मक ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. या दरम्यान तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसेल. त्याचबरोबर, तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. शुक्र ग्रहाच्या परिवर्तनाने तुमच्या कुंडलीत सकारात्मक परिणाम दिसतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या पंचम स्थानी हे संक्रमण होणार आहे. या काळात तुमची लव्ह लाईफ फार चांगली असेल. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार महत्त्वाचं ठरणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमतं मन रमेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून पैशांची बचत करण्याकडे तुमचा कल असणार आहे. तसेच, कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















