Rajyog : अवघ्या 12 दिवसांत घडणार मालव्य राजयोग; 'या' 3 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, होणार धनवर्षाव
Malavya Rajyog : शुक्र ग्रह मीन राशीत गेल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे, हा योग काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.
Shukra Gochar : मार्चचे शेवटचे दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यात धन-वैभवाचा दाता असलेला शुक्र ग्रह 31 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह मीन राशीत गेल्याने ‘मालव्य राजयोग’ तयार होईल. ज्योतिषशास्त्रात (Astrology) मालव्य राजयोगाला (Malavya Rajyog) विशेष महत्त्व आहे. मार्चच्या शेवटी बनत असलेला मालव्य राजयोग (Malavya Rajyog) 3 राशींसाठी फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, तसेच गुंतवणुकीत फायदा होईल.
मिथुन रास (Gemini)
मालव्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्म घरात तयार होणार आहे . त्यामुळे या काळात तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. याशिवाय, तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. या काळात तुम्ही पैशाची चांगली बचत करू शकाल. तुम्ही बऱ्याच दिवसांआधी एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला आता परत मिळू शकतात. शुक्राच्या प्रभावामुळे व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. फिल्म लाईन, मीडिया, कला, संगीत आणि फॅशन डिझायनिंगशी निगडित लोकांना या काळात चांगला लाभ मिळू शकतो.
कन्या रास (Virgo)
मालव्य राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल, कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या सप्तम भावात तयार होणार आहे, यामुळे या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्हाला सहकार्य मिळेल. यावेळी तुमची लव्ह लाईफही चांगली राहील. तसेच, जे अजून अविवाहित आहेत त्यांना या काळात लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात तुम्ही जे काही निर्णय घ्याल, त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि कामावर सगळे प्रशंसा करतील. तुम्हाला व्यवसायातही आर्थिक लाभ होईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात तयार होणार आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुख मिळू शकतं. तसेच तुम्ही गाडी किंवा घर खरेदी करू शकता. यावेळी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तसेच राजकारणाशी संबंधित असलेल्यांना चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुमचे आईसोबतचे संबंध चांगले राहतील. कलेच्या क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :