(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shukra Gochar 2024 : शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने सर्व 12 राशींवर नेमका कसा परिणाम होणार? जाणून घ्या ग्रहांची स्थिती
Shukra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाने कन्या राशीत संक्रमण केलं आहे. ग्रह काही राशीच्या लोकांचे स्वामी तर काहींचे मित्र असतात.
Shukra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. पण, 25 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रहाने (Shukra Gochar) कन्या राशीत संक्रमण केलं आहे. ग्रह काही राशीच्या लोकांचे स्वामी तर काहींचे मित्र असतात. तर, काही राशीच्या लोकांसाठी फार हानिकारक असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, कोणकोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांसाठी शुक्र ग्रहाचा प्रभाव पडणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मेष रास
या राशीचे लोक जास्तीत जास्त पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्याला प्राधान्य देतात. नातेसंबंध आणि व्यवसाय या बाबतीत अशा लोकांना फार सतर्क राहावं लागतं. तसेच, जोडीदाराबरोबर यांचे सतत खटके उडत असतात. मात्र, या सगळ्यात तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांना या काळात आपल्या चारित्र्याच्या बाबतीत फार सावध राहायचं आहे. तुमचं मानसिक आरोग्य स्थिर ठेवा. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळतील.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना या काळात थोडं सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक संधी चालून येतील त्याचा योग्य वेळी लाभ घ्या. अन्यथा संधी हातातून निघून जाईल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांना कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. या दरम्यान तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. लहान-बहीण भावंडांबरोबर संबंध चांगले ठेवा.
सिंह रास
व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायाच्या मदतीने प्रवास करावा लागू शकतो. कोणाला पैसे देत असाल तर वेळीच सावध व्हा. कोणावरही अंध विश्वास ठेवू नका.
कन्या रास
जे तरुण प्रेमविवाह करण्याचा विचार करत आहेत त्यांचं नातं हळूहळू पुढे जाईल. तसेच, तुमच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो.
तूळ रास
या राशीच्या लोकांना फार तणाव जाणवू शकतो. तणावाला कमी करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ मित्र-परिवाराबरोबर घालवाल. तसेच, उत्पन्ना बरोबरच तुमच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये काही बदल आणायचे असतील तर तुम्ही आणू शकता. तसेच, जोडीदाराच्या सहकार्याने तुम्ही चांगला व्यापार कराल. पार्टनरशिपमध्ये चांगला व्यवहार कराल.
धनु रास
धनु राशीच्या लोकांनी या काळात सावध राहण्याची गरज आहे. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मकर रास
मकर राशीचे लोकांचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. तसेच, तुम्ही जे कार्य कराल त्यात तुमच्या बॉसचं तुम्हाला सहकार्य मिळेल.
कुंभ रास
या काळात कुंभ राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने व्यापारी वर्गातील लोकांना चिंता करण्याची गरज नाही.
मीन रास
मीन राशीच्या लोकांना काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूवर खर्च करण्याची आवश्यकता आहे. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)