Shukra Gochar 2024 : अवघ्या 3 दिवसांनी शुक्राचं राशी परिवर्तन; मेषसह 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार वाढ, राहा सतर्क
Shukra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रात, सुख-सुविधांचा दाता शुक्र ग्रह लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे.
Shukra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशींवर सकारात्मक होतो तर काही राशींवर नकारात्मक होतो. ज्योतिष शास्त्रात, सुख-सुविधांचा दाता शुक्र (Venus) ग्रह लवकरच राशी परिवर्तन करणार आहे. याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृश्चिक राशीत शुक्राचा प्रवेश
13 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजून 49 मिनिटांनी शुक्र ग्रह तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींसाठी याचा परिणाम फार अशुभ असणार आहे. या 3 राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शुक्राचं राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी काहीसं आव्हानात्मक असू शकतं. या राशीच्या लोकांना शारीरिक कष्ट करावे लागू शकतात. तसेच,या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल देखील सतर्क असणं गरजेचं आहे. तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही थोडे चिंतेत असू शकता.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, तुम्हाला व्यवसायात संघर्ष करावा लागू शकतो. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आधी योग्य विचार करा. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच, कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण हे शुभ नसणार आहे. या राशीच्या लोकांवर संक्रमणाचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात कोणताही व्यवहार करु नका. अन्यथा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्या. तसेच, तुमच्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :