Shravan Somvar 2024 : श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
Shravan Somvar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला जे फूल आपण वाहतो त्याचा पुन्हा वापर केला जात नाही. पण, बेलपत्र याला अपवाद आहे.
Shravan Somvar 2024 : हिंदू कॅलेंडरप्रमाणे चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. 5 ऑगस्टपासून श्रावणमासाला (Shravan) सुरुवात झाली असून त्यानुसार आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त (Shravan Somvar 2024) दुसरी शिवामूठ तीळ आहे. श्रावणात शिवामूठीबरोबरच भगवान शंकराला बेलपत्र वाहण्याची देखील परंपरा आहे. याच बेलपत्राचा (Bela Patra) धनवृद्धीसाठी नेमका कसा वापर करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान शंकराला जे फूल आपण वाहतो त्याचा पुन्हा वापर केला जात नाही. पण, बेलपत्र याला अपवाद आहे. बेलपत्राचा धनवृद्धीसाठी देखील चांगला उपयोग करता येतो.
बेलपत्राचा धनवृद्धीसाठी 'असा' करा उपयोग
श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहण्याआधी बेलपत्राच्या तिन्ही पानांवर 'ओम नम: शिवाय' लिहा. तसेच, हा शिवमंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर हे पान उचलून घराच्या तिजोरीजवळ न्या. तसेच, पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत तो आकडा मनात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सध्या मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा थोड्या अधिक रकमेचा विचार करावा. जास्त अपेक्षा केल्यास तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. यासाठी पुढच्या श्रावणापर्यंत तुमच्या तिजोरीत किती रक्कम जमा होऊ शकते अशी प्रार्थना करा.
शंकराची पूजा कशी करावी?
प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.
शिवामूठ व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :