Shravan Somvar 2024 : श्रावणी सोमवारी राशीनुसार करा 'हे' उपाय; सर्व अडचणी होतील दूर, महादेवाच्या कृपेने नांदेल सुख-शांति
Shravani Somvar Upay : श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात.
Shravan Somvar Remedies : श्रावणातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचं (Shravan Somvar 2024) व्रत केलं जातं. शिव भक्त भक्त भक्तिरसात तल्लीन होऊन या महिन्यातील व्रत-वैकल्यं करतात. श्रावणी सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. श्रावणी सोमवारी सुख-शांतिसाठी राशीनुसार कोणते उपाय (Shravan Remedies) करावे? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं, असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिव तांडव स्तोत्राचं पठण करावं.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे 108 दाणे मोजावेत, ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत. तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावं. हा उपाय केल्यास भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहील.
सिंह रास (Leo)
श्रावणी सोमवारी शंकराचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिव परिवाराची यथायोग्य पूजा करावी. तसेच भोलेनाथला पांढरं चंदन आणि पांढरी फुलं अर्पण करावी.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा.
वृश्चिक रास (Scorpio)
श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिव चालीसा पठण करून ॐ नमः शिवाय मंत्राचा जप 108 वेळा करावा.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गो मातेची सेवा करावी.
कुंभ रास (Aquarius)
श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवशंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र, हिरवी मूग आणि भांग अर्पण करावी आणि 'श्री शिवाय नमस्तुभ्यम्' या मंत्राचा जप करावा.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि शिव चालिसा पठण करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :