एक्स्प्लोर
Shardiya Navratri 2025 : नवरात्रीत सर्व 12 राशींनुसार करा 'या' देवीची पूजा; ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या उपाय आणि वैशिष्ट्य
Shardiya Navratri 2025 : यंदाच्या नवरात्रीत सर्व 12 राशींपैकी कोणत्या राशीने कोणत्या देवीची पूजा करावी आणि त्याचे कोणते वैशिष्ट्य आहेत तसेच त्यासाठी कोणते उपाय करावेत या संदर्भात जाणून घेऊयात.

Shardiya Navratri 2025
Source : ABP Web Team
Shardiya Navratri 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, शारदीय नवरात्रोत्सव (Shardiya Navratri 2025) अवघ्या काही दिवसांवर आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा आराधना केली जाते. मात्र, यंदाच्या नवरात्रीत सर्व 12 राशींपैकी कोणत्या राशीने (Zodiac Signs) कोणत्या देवीची पूजा करावी आणि त्याचे कोणते वैशिष्ट्य आहेत तसेच त्यासाठी कोणते उपाय करावेत या संदर्भात सविस्तर माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे ती जाणून घेऊयात.
नवरात्रात राशीनुसार देवी आणि उपाय
मेष रास (Aries) – शैलपुत्री
- देवीला लाल फुलं आणि लाल वस्त्र अर्पण करा.
- उपासकाने गूळ-चना गरीबांना वाटावे.
वृषभ रास (Taurus Horoscope) – ब्रह्मचारिणी
- देवीला दही-साखर अर्पण करा.
- दुग्धजन्य पदार्थांचे दान करावे.
मिथुन रास (Gemini Horoscope) – चंद्रघंटा
- देवीला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा.
- मंदिरात घंटानाद करावा.
कर्क रास (Cancer Horoscope) – कुष्मांडा
- देवीला मध, नारळ, भोपळा अर्पण करा.
- पितरांना अन्नदान करावे.
सिंह रास (Leo Horoscope) – स्कंदमाता
- देवीला लाल वस्त्र आणि सफरचंद अर्पण करा.
- लहान मुलांना मिठाई द्यावी.
कन्या रास (Virgo Horoscope) – कात्यायनी
- देवीला सुगंधी फुलं, पिवळे वस्त्र अर्पण करा.
- सुहासिनींना हळद-कुंकू द्यावे.
तूळ रास (Libra Horoscope) – कालरात्री
- देवीला काळ्या वस्त्रात तीळ व तेल अर्पण करा.
- शनी मंदिरात दिवा लावा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope) – महागौरी
- देवीला पांढरी फुलं, दुधी भोपळा अर्पण करा.
- गरिबांना तांदूळ-दूध द्यावे.
धनु रास (Sagittarius Horoscope) – सिद्धिदात्री
- देवीला पिवळा प्रसाद (बेसन लाडू) द्या.
- ब्राह्मण किंवा साधूंना भोजन द्यावे.
मकर रास (Capricorn Horoscope) – शैलपुत्री
- देवीला दुर्वा, बेल अर्पण करा.
- शिवलिंगावर जल व दुग्धाभिषेक करावा.
कुंभ रास (Aquarius Horoscope) – कुष्मांडा
- देवीला मध, गूळ व फळं अर्पण करा.
- पक्ष्यांना धान्य द्यावे.
मीन रास (Pisces Horoscope) - महागौरी
- देवीला पांढरी वस्त्रे व शंख अर्पण करा.
- अनाथ मुलांना अन्नदान करावे.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :
Shardiya Navratri 2025 : शारदीय नवरात्रीत जुळून येणार ग्रहांचा शुभ योग! 'या' 3 राशींची पापांतून होणार मुक्ती, पदरात पडणार फक्त पुण्य
आणखी वाचा




















