एक्स्प्लोर

Shardiya Navratri 2022 : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी केली जाते कात्यायनी देवीच्या रूपाची पूजा; जाणून घ्या आख्यायिका

Shardiya Navratri 2022 : नवरात्रीचा सहावा दिवस असून आजच्या दिवशी कात्यायनी देवीच्या रूपाची पूजा केली जाते. जाणून घ्या आख्यायिका...

Shardiya Navratri 2022 : आज नवरात्राचा सहावा दिवस... आजच्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची (Katyayani Devi) पूजा केली जाते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कात्यायनी देवी ओळखली जाते. काय आहे कात्यायनी देवीची आख्यायिका? जाणून घ्या...

देवी दुर्गेचं सर्वपरिचित रूप म्हणजे देवी कात्यायनी. देवीला ही ओळख मिळण्यामागे एक कथा आहे. कत् नामक एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचे पुत्र ऋषी कात्य असे त्यांचं नाव होतं. याच कात्य ऋषिंच्या गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. त्यांनी भगवती पराम्बा हिची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. आई भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला. 

काही कालानंतर जेव्हा महिषासूर नावाचा असूर पृथ्वीवर अत्याचार करू लागला. तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपल्या शक्तीचा अंश एकवटून देवीला आवाहन केलं. महर्षी कात्यायनांनी त्यांची सर्वप्रथम पूजा केली आणि त्यांचीच देवीला ओळख मिळाली आणि ती कात्यायनी म्हटली जाऊ लागली. 

त्याचप्रमाणे आणखीही एक कथा ऐकायला मिळते की, महर्षी कात्यायन यांच्या वंशात देवीने जन्म घेतला. अश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीपर्यंत तीन दिवस कात्यायन ऋषिंनी देवीचं अनुष्ठाण मांडले आणि त्याच कालावधीत देवी कात्यायनीनं दशमीला महिषासूराचा वध केला. 

देवी कात्यायनी अमोघ फलदायिनी आहे. भगवान श्रीकृष्णांना पतिरूपात मिळवण्यासाठी गोपिकांनी देवी कात्यायनीचेच व्रत केलं होतं. देवीचं रूप अत्यंत भव्य-दिव्य आहे. तिचा वर्ण सोनेरी आणि तेजस्वी आहे. तिला चार भुजा आहेत. एका हाताने देवी आशीर्वाद देत आहेत, तर दुसऱ्या हाताने अभय देत आहे. तिसऱ्या हातात तलवार आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे. देवी कात्यायनी सिंहासनावर आरूढ झाली आहे. 

नवरात्रीच्या (Navratri 2022) सहाव्या दिवशी देवी  साधकाचे मन 'आज्ञा' चक्रात स्थिरावते. योगसाधनेत आज्ञा चक्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे. या चक्रात स्थित असलेला साधक आई कात्यायनीच्या चरणी सर्वस्व अर्पण करून शरण जातो. त्याच्या समर्पित भावामुळे देवी प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. 

कात्यायनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते. भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो.  रोग, शोक, संताप, भय सर्व नष्ट होते. तसेच जन्मोजन्मीच्या पापातूनही मुक्तता होते. यासाठी देवीच्या उपासनेला पर्याय नाही. देवी कात्यायनी आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते. सदैव तिच्या सान्निध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपाछायेत आयुष्य व्यतित करावे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
Vastu Tips : रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश
रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget