shani : शनीच्या साडेसातीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत 'या' तीन राशी, अडचणी टाळण्यासाठी करा हे उपाय
Shani : कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. त्यामुळे या लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे.

Shani : ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण सर्व राशीच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकते. अलीकडे म्हणजे 29 एप्रिल रोजी शनीचे कुंभ राशीत भ्रमण झाले आहे. त्यामुळे 12 मधील तीन राशींवर साडेसाती सुरू झाली आहे. शनीची साडेसाती सुरू झाल्यामुळे या राशींच्या अडचणी वाढल्या आहेत. या अडचणी टाळण्यासाठी काही उपाय केल्यास फायदे मिळू शकतात.
कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. त्यामुळे या लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. एखादे तयार केलेले काम खराब होऊ शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुम्ही गंभीर आजाराला बळी पडू शकता. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिच्या धैय्याचा प्रकोप सुरू झाला आहे.
शनिवारी शनीची पूजा केल्यानंतर उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे या काळ्या वस्तूंचे दान करा. असे केल्याने शनिदेवाची कृपा कायम राहते असे मानले जाते. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. तब्येत सुधारेल. शनिवारी शनि पूजेच्या वेळी 'ओम प्रेमं प्रण सह शनिश्चराय नमः' आणि ओम शनिश्चराय नमः' या मंत्रांचा जप करा. शनिवारी हनुमानजींची पूजा करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :



















