Shani Pradosh 2024 : आज शनि प्रदोष व्रत! जाणून घ्या राहुकाल, योग आणि आजचा शुभ मुहूर्त, वाचा मराठी पंचांग
Shani Pradosh 2024 : आज 6 एप्रिल 2024 रोजी वर्षातील पहिला शनि प्रदोष व्रत आहे, शिवलिंगाची पूजा केल्याने शिव आणि शनीची आशीर्वाद प्राप्त होतील.
Shani Pradosh 2024 : पंचांगानुसार आज 6 एप्रिल म्हणजेच, या वर्षातला शेवटचा शनि प्रदोष व्रत (Shani Pradosh Vrat) आहे. या दिवशी जे भक्त भगवान शंकराची पूजा करतात त्यांच्या वैवाहिक जीवानातील अडथळे दूर होतात. तसेच, त्यांची अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. या दिवशी सूर्यास्तानंतर शिवलिंगाचा जलाभिषेक करून दशरथकृत शनि स्तोत्राचे पठण करणं चांगलं मानलं जातं. यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो. तसेच, कुटुंबात सुख-समृद्धी राहते. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
शनि प्रदोषसाठी आजचे उपाय
आज शनिवारी पितळेच्या भांड्यात तिळाचे तेल भरून त्यात तुमचा चेहरा पाहा आणि काळ्या कपड्यात काळे उडीद, 1.25 किलो धान्य, दोन लाडू, फळे, काळा कोळसा आणि लोखंडी खिळे गरजूंना दान करा. यामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होतो. आजचा दिवस शुभ, अशुभ कसा असणार आहे. तसेच, राहुकाल, शुभ योग, ग्रह बदल, व्रत आणि सण, आजच्या पंचांगची तारीख आणि तिथी, नक्षत्र याबद्दल जाणून घेऊयात.
आजचं पंचांग जाणून घ्या!
वार | शनिवार |
तिथी | द्वादशी - 10:21:52 पर्यंत |
नक्षत्र | शतभिष - 15:40:20 पर्यंत |
करण | तैतुल - 10:21:52 पर्यंत |
गर | 20:40:31 पर्यंत |
पक्ष | कृष्ण |
योग | शुभ - 06:14:16 पर्यंत |
शुक्ल | 26:19:03 पर्यंत |
सूर्योदय | सकाळी 06:07:21 वाजता |
सूर्यास्त | 18:42:11 |
चंद्र रास | कुंभ |
चंद्रोदय | 29:03:59 |
चंद्रास्त | 16:07:00 |
ऋतू | वसंत |
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:37:06
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - फाल्गुन
शनि त्रयोदशीच्या दिवशी करा हा खास उपाय
- शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, निळे वस्त्र किंवा मोहरीचे तेल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
- शनीची सदेसती आणि शनीच्या धैय्यामुळे त्रास होत असेल तर शनि त्रयोदशी किंवा शनि प्रदोष व्रत अवश्य पाळावे. असे केल्याने शनीची साडेसाती आणि शनीच्या धैय्याचा प्रभाव कमी होतो.
- शनि त्रयोदशीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करा, शनिदेव नेहमी हनुमानजींच्या भक्तांची मदत करतात आणि त्यांच्यावर आपला आशीर्वाद ठेवतात.
- शनि त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने शनि देव नेहमी प्रसन्न राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.
- शनि त्रयोदशीच्या दिवशी असहाय्य लोकांना मदत करा, तुम्ही अन्न, कपडे इत्यादी दान देखील करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :