Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर आज शनीचं नक्षत्र परिवर्तन; कुंभसह 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत
Shani Nakshatra Parivartan : आज शनीची चाल पुन्हा बदलणार आहे. शनीचं आज नक्षत्र परिवर्तन होईल, ज्याचा फायदा काही राशींना होईल आणि या काळात त्यांचं भाग्य उजळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? पाहा
![Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर आज शनीचं नक्षत्र परिवर्तन; कुंभसह 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत shani nakshatra parivartan saturn nakshatra transit from 6 april to purvabhadrapada nakshatra these zodiac signs will get huge benefit Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर आज शनीचं नक्षत्र परिवर्तन; कुंभसह 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचे संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/6c83909d4ee8417af99f078a0436577e1712297503621343_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Dev : जेव्हा जेव्हा शनीची (Shani) चाल बदलते तेव्हा सर्व लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. शनि हा संथ गतीचा ग्रह असल्याने त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल दीड वर्ष लागतो. शनिदेवाच्या संथ गतीमुळे त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर दीर्घकाळ राहतो. शनि सध्या मूळ त्रिकोण राशीत, म्हणजेच कुंभ राशीत आहे.
शनीच्या राशी परिवर्तनाला दीड वर्ष लागत असला तरी नक्षत्र परिवर्तन हे वारंवार होत असतं. शनि 6 एप्रिल रोजी दुपारी 03.55 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात (Purva Bhadrapad Nakshatra) प्रवेश करेल. शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. परंतु 3 राशींसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन विशेष फलदायी ठरेल. हे लोक नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती करतील. या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कन्या रास (Virgo)
पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होणारं शनीचं मार्गक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे या काळात विशेष प्रगती करतील. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्येही वाढ होईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुमचं वैवाहिक जीवन या काळात आनंदी राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
शनिदेवाच्या नक्षत्रात होणारा बदल वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी अनुकूल ठरेल. वर्षांपासून रखडलेल्या तुमच्या कामाला या काळात गती मिळेल. संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. या राशीच्या लोकांना सर्व भौतिक सुखं मिळतील. यासोबतच करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता, तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. सुखी वैवाहिक जीवनामुळे मन प्रसन्न राहील. आईच्या आरोग्याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, आईसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण शुभ मानलं जातं, कारण शनिदेव तुमच्या राशीच्या चढत्या घरात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. वैवाहिक जीवन छान राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल, पैशांचा पाऊस पडू शकतो. कुटुंब आणि पूर्वजांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)