Shani 2024 : शनि-मंगळ पाडणार पैशांचा पाऊस; षडाष्टक योगामुळे 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, वेळोवेळी अनपेक्षित धनलाभाचे संकेत
Shadashtak Yog 2024 : शनि आणि मंगळाच्या स्थितीमुळे तयार होत असलेला षडाष्टक योग काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. या राशींना लवकरच सोन्याचे दिवस येतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
Shadashtak Yog 2024 : ग्रहांचा सेनापती मंगळ याला नवग्रहांमध्ये अत्यंत विशेष स्थान आहे, मंगळ आणि शनीच्या राशी बदलाचा विशेष परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. शनीला एका राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे 30 वर्षं लागतात. शनि सध्या कुंभ राशीत स्थित आहे, तर मंगळ कर्क राशीत आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या भावात असल्यामुळे षडाष्टक योग तयार होत आहे.
ज्योतिषशास्त्रात षडाष्टक योग (Shadashtak Yog) अत्यंत अशुभ मानला जातो. याच्या निर्मितीमुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु अशा काही राशी आहेत, ज्यांवर या काळात शनीची आणि मंगळाची विशेष कृपा राहील, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग अनुकूल ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुमच्या संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे, उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात नवीन योजना बनवू शकता, यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचं जीवन आनंदाने बहरुन जाईल. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल.
तूळ रास (Libra)
या राशीच्या लोकांना शनी-मंगळाच्या स्थितीचा विशेष लाभ मिळू शकतो. षडाष्टक योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. कुटुंबात सुख-शांती राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्यही चांगलं राहील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनाही षडाष्टक भरपूर लाभ मिळू शकतात. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात. जीवनात सुख-शांती नांदेल. व्यवसायातही मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यासह तुमच्या कामाचं कौतुक केलं जाऊ शकतं. तुमचं आरोग्यही ठणठणीत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: