Shani Gochar 2024 : मार्गीनंतर शनीने पहिल्यांदाच बदलली चाल; 'या' 3 राशींच्या मार्गातील अडथळे होतील दूर, चौफेर होणार धनलाभ
Shani Gochar 2024 : शनीने पूर्व भाद्रपद नक्षत्रात संक्रमण केल्यानंतर वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हा काळ फार महत्त्वाचा आहे. शनीच्या चालीचा 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे.
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, काल म्हणजेच 27 डिसेंबर 2024 रोजी शनीने (Shani Dev) आपली चाल बदलली आहे. 15 नोव्हेंबरपासून शनीने (Lord Shani) मार्गी चाल केली होती. त्यानंतर मार्गी झाल्यानंतर शनीने पहिल्यांदा आपली चाल बदलली आहे. शनीने पूर्व भाद्रपद नक्षत्रात संक्रमण केल्यानंतर वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हा काळ फार महत्त्वाचा आहे. शनीच्या चालीचा 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीचं हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला ठरणार आहे. तसेच, तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल. या काळात शनीचा प्रभाव गंभीर असणार आहे. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेताना कोणतीही घाईगडबड करु नका.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तसेच, कुटुंबात सुरु असलेले मतभेद लवकरच संपुष्टात येतील. या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. या दरम्यान तुमच्या मनात कोणतीच अहंकाराची भावना मनात ठेवू नका. या काळात जर तुम्हाला जमीन, वाहन किंवा एखादी संपत्ती विकत घ्यायची असेल तर त्यासाठी या काळात अनेक शुभ योग आहेत. तुमचा दीर्घकालीन आजार दूर होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या संक्रमणाचा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीनवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल. तर, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी हा काळ फार चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: