Dhan Yog On Buddha Purnima : यंदा 23 मे रोजी बौद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2024) साजरी केली जाणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शनीची स्थिती काही राशींसाठी फलदायी सिद्ध होऊ शकते. शनीने 6 मे रोजी नक्षत्र परिवर्तन करून पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला. शनी सध्या आपल्या स्वराशीत, म्हणजेच कुंभ राशीत स्थित आहे. येत्या काही दिवसांत शनी जयंती सुद्धा येत आहे.


त्यात आता तब्बल 200 वर्षांनंतर बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी कित्येक वर्षांनी शनी स्वतःच्या घरी आणि पूर्वभाद्रपद नक्षत्रात असणार आहे. यामुळे 3 राशींवर शनीचा शुभ प्रभाव असेल. या राशींना येत्या काळात मालामाल होण्याची संधी शनीमुळे मिळू शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


बुद्ध पौर्णिमेला 'या' राशींवर राहणार शनीची कृपा


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना या दिवशी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुमच्या मिळकतीत वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. पूर्वी झालेल्या खर्चातील वाढ आता आटोक्यात येऊ शकतो. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली राहील. तुम्हाला व्यवसायात मोठी डील मिळू शकते किंवा तुमच्या काही योजना यशस्वी होऊ शकतात. 


वृषभ रास (Taurus)


बुद्ध पौर्णिमेपासून वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रमोशनचे योग आहेत, तुम्ही तुमच्या आवडीची पोस्ट मिळवू शकता. गुंतवणुकीतून विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना पैसे कमावण्याच्या भरपूर संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत तुमची प्रगती होईल. खासगी जीवनाशी संबंधित कामं पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांवर शनिची कृपा राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. गुंतवणूक केल्यास त्यात तुम्हाला नफा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Numerology : पटकन हायपर होतात 'या' जन्मतारखेचे लोक ; नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग


Venus And Sun Yuti : तब्बल 5 वर्षानंतर शुक्र आणि सूर्याची युती; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ