Numerology Of Mulank 9 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 9 असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे.

Continues below advertisement

मूलांक 9 चे लोक खूप धैर्यवान असतात, त्याच बरोबर त्यांचा स्वभाव खूप तापट असतो. त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमी राग असतो. अंकशास्त्रानुसार, मूलांक 9 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळाच्या वर्चस्वामुळे 9 मूलांकाचे लोक खूप तापट असतात.

मंगळाचा असतो यांच्यावर प्रभाव

मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे, जो राग, उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे. मूलांक नऊचा स्वामी मंगळ ग्रह आहे. 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक रागीट तर असतात. यासोबत ते सगळ्याच गोष्टीत उत्साही असतात. त्यांच्यात निडर आणि धाडसी स्वभाव देखील कसून भरलेला असतो.

Continues below advertisement

नेहमीच नाकाच्या शेंड्यावर असतो राग

या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो. एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात. एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात. या लोकांचा स्वभावच मूळात तापट असतो, त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

अतिशय धाडसी आणि आत्मविश्वासू असतात

9 मूलांकाचे लोक अतिशय निर्भय आणि धाडसी स्वभावाचे असतात. ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात. मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यामध्ये हे गुण असतात. या लोकांच्या आत आत्मविश्वास कसून भरलेला असतो. कोणतीही जोखीम घ्यायला ते अजिबात घाबरत नाहीत.

शिस्तीचे असतात पक्के

अंकशास्त्रानुसार, 9 मूलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडते. त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात. त्यांचा हा गुण सर्वांनाच आवडतो आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

उच्च शिक्षण घेतात 

9व्या क्रमांकाचे लोक शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची त्यांच्यात चांगली क्षमता आहे. हे लोक उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यात यशस्वी होतात. त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : खूपच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेची मुलं; यांना मनातील भावनाही धड करता येत नाही व्यक्त