पुणे : पुण्यात भरधाव वेगात गाडी (Pune Porsche Car Accident) चालवून अगरवाल बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला.  कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं. या मुलाला पुन्हा जुवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. मुलाला  15 तासात जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरून सरकार आता अॅक्शन मोडवर आलंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांना फोन करून महत्त्वाच्या सूचना दिल्यात. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी बालहक्क मंडळाच्या  आदेशांवर आक्षेप घेतलाय.


दरम्यान कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केलीय. या मुलाला पुन्हा जुवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.  मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर 185 कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. बालहक्क मंडळात फेरविचार याचिका दाखल आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले. पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तातडीने कलम 304  नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला याकडे त्यांनी लक्ष वेधलं.  


बालहक्क मंडळाच्या आदेशांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप 


अल्पवयीन असल्याचा फायदा विशाल अगरवाल यांच्या मुलाला मिळाला.  कोर्टानं त्याला अवघ्या काही तासात जामीन दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालहक्क मंडळाच्या आदेशांवर आक्षेप घेतलाय. या अटी आश्चर्यकारक असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय. आरोपी मुलगा अल्पवयीन असला तरी निर्भया प्रकरणानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार सज्ञान व्यक्तीप्रमाणेच त्याच्यावर कारवाई करावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. बालहक्क मंडळात फेरविचार याचिका दाखल आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले. पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तातडीने कलम 304  नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला याकडे त्यांनी लक्ष वेधलं.  


हे ही वाचा :


मोठी बातमी! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांचा या आधीही वरदहस्त