Shani Dev : मार्च 2025 पर्यंत 'या' राशींवर असणार शनीची वाईट नजर; खिशाला लागेल कात्री, हाती येईल कंगाली
Shani Dev : शनी कुंभ राशीत असल्याने 5 राशींना साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर, 3 राशींच्या लोकांवर शनीची वाईट नजर असणार आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच, न्यायदेवता म्हणतात. शनी (Lord Shani) सध्या आपली मूळ त्रिकोण रास म्हणजेच कुंभ राशीत वक्री चाल सुरु आहे. याचा 3 राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे. या काळात शनीची वाईट नजर या राशींवर पडणार आहे. यामुळे तुम्हाला नुकसान करावं लागू शकतं.
ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीच्या वक्री चालीचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. आपल्याला माहीत आहे की, शनी कोणत्याही राशीत अडीच वर्षांपर्यंत असतात. त्याचबरोबर, शनी हा असा एकमेव ग्रह आहे ज्याच्या साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम राशींवर होतो. सध्या 3 राशींवर शनीची वाईट नजर आहे.
शनी कुंभ राशीत असल्याने 5 राशींना साडेसाती आणि ढैय्याचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर, 3 राशींच्या लोकांवर शनीची वाईट नजर असणार आहे. त्यामुळे धनहानी, अनावश्यक वादविवाद, तणाव आणि संकटांचा सामना करावा लागणार आहे. शनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी मार्गी होणार आहे. त्यानंतर, मार्च 2025 मध्ये शनी संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. या 3 राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहण्याची गरज आहे. अन्यथा, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुमचे शत्रू तुमच्या समस्या वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीची वेळीच तयारी करुन ठेवा. अन्यथा तणाव राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांवर सध्या शनीची तिसरी दृष्टी आहे. त्यामुळे या राशीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढ-उतार दिसून येतील. कुटुंबातील वातावरण तणावपूर्वक असण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तणाव लागू शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांवर शनीच्या वाईट दृष्टीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.छोट्या-छोट्या कामासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पैसे खर्च करताना जरा जपूनच करा. तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :