एक्स्प्लोर
Shani Dev : कुंडलीत जर शनी कमजोर असेल तर सर्वात आधी दिसतात 'ही' लक्षणं; जाणून घ्या शनी बळकट करण्याचे सर्वोत्तम उपाय
Shani Dev : जर कुंडलीत शनी अशुभ स्थानी असेल तर शनी दोष येतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या येऊ लागतात.
Shani Dev : नऊ ग्रहांमध्ये आपलं स्थान असलेल्या शनीला (Shani Dev) न्यायदेवता म्हटलं गेलं आहे. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शनीला (Lord Shani) न्यायाधीशाचे पद आहे. पण, जर कुंडलीत शनी अशुभ स्थानी असेल तर शनी दोष येतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या येऊ लागतात. शनी दोष आल्यावर अनेक लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणं जर जाणून घेतली तर शनीदोषापासून मुक्ती मिळवता येते.
शनी दोषाची लक्षणे
- जर कुंडलीत शनीदोष असेल तर व्यक्तीचा पैसा आणि संपत्ती हळूहळू अनावश्यक कामात खर्च होऊ लागते.
- शनीदोष असला की वादाची परिस्थिती निर्माण होते. व्यक्तीवर खोटे आरोप केले जातात.
- दारू, जुगार आणि इतर वाईट सवयींमुळेही शनीदोष होतो. कामात अडथळे येणे, कर्जाचं ओझं, घरात आग लागणे, घर विकणे किंवा त्याचा कोणताही भाग कोसळणे इत्यादी देखील शनीदोषाची लक्षणे मानली जातात.
- जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असेल तर त्या व्यक्तीचे केस अकाली गळतात, डोळे खराब होतात आणि कान दुखतात. अशुभ शनीमुळे शारीरिक अशक्तपणा, पोटदुखी, टीबी, कर्करोग, त्वचारोग, फ्रॅक्चर होणे, पक्षाघात, सर्दी, दमा यांसारखे आजार होतात.
- जर एखाद्याचा शनी वाईट असेल तर त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. नोकरीत अडचणी आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात वाद होतात.
शनी ग्रह मजबूत करण्याचे मार्ग
- ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येला पिंपळाच्या मुळाला कच्च्या दुधात गोड पाणी मिसळून तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने अनेक प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते. पिंपळाच्या झाडाची पूजा करून शनीची साडेसाती किंवा धैय्याला प्रदक्षिणा घातल्याने शनीदेवाच्या त्रासापासून आराम मिळतो. सुख-शांती वाढवण्यासाठी या दिवशी पिंपळाचे झाड लावणे चांगले मानले जाते.
- दर शनिवारी लोखंडाच्या भांड्यात संपूर्ण उडीद, काळे हरभरे आणि मोहरीचे तेल एकत्र करून घ्या. आता काळ्या कपड्यात गुंडाळून कपाळाला लावा आणि दान सुरू करा, यामुळे शनीदोष कमी होतो.
- शनिवारी शनिदेवाच्या दिव्य मंत्राचा जप 'ओम प्राण प्रीण प्रौं स: शनैश्चराय नमः' केल्याने प्राणी भयमुक्त राहतो.
- शनीदेवाचे उपासक भगवान शिव आहेत. शनिदोष शांत करण्यासाठी शनिवारी शनीदेवाच्या पूजेबरोबरच 'ओम नमः शिवाय'चा उच्चार करताना काळ्या तीळ मिसळलेल्या पाण्याने भगवान शंकराला अभिषेक करावा.
- शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने शनिवारी व्रत ठेवावे आणि गरीब लोकांना मदत करावी, असे केल्याने जीवनातील संकटे दूर होतात.
- हनुमानजींची पूजा करणाऱ्यांवर शनी देव नेहमी प्रसन्न राहतात, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनीपूजेसोबतच हनुमानजींचीही पूजा करावी, शनीदोषापासून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : 'या' 3 राशींवर शनीची साडेसाती सुरु, तर 2 राशींवर ढैय्या; पुढच्या काळात कोणत्या राशींवर कधी असणार शनीची साडेसाती? जाणून घ्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement