Shani Dev : दिवाळीनंतर 15 दिवसांनी शनीची मार्गी चाल, 'या' 3 राशींना धोक्याची घंटा; पावलोपावली मिळतील अशुभ संकेत
Shani Dev : शनी ग्रह 2024 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी मार्गी होणार आहे. याचाच अर्थ शनी दिवाळीनंतर 15 दिवसांनी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) ग्रह लवकरच एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर (Diwali 2024) काही राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. शनी (Lord Shani) सध्या आपली स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीत शनी 29 जून 2024 रोजी वक्री झाले होते. त्यानंतर याचवर्षी दिवाळीनंतर शनी वक्रीतून मार्गी होणार आहे.
शनी ग्रह 2024 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी मार्गी होणार आहे. याचाच अर्थ शनी दिवाळीनंतर 15 दिवसांनी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. शनी एकूण 139 दिवसांपर्यंत शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत असणार आहे. त्यानंतर शनी मार्गी होणार आहेत. या दरम्यान कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळणार ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांचा दिवाळीनंतर 15 दिवसांनी कठीण काळ सुरु होणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, या दरम्यान कोणत्याच प्रकारचा मानसिक तणाव घेऊ नका. कुटुंबात शाब्दिक वाद वाढू शकतात. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कुटुंबातील वाद सोडविण्याचा प्रयत्न करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांनी दिवाळीनंतर सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुम्ही एखाद्या अडचणीत अडकू शकतात. त्यामुळे त्यातून निघण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही तुमच्या कुटुंबियांवर लक्ष देणं गरजेचं आहे. कुटुंबियांबरोबर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच अलर्ट राहा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांचा दिवाळीनंतर सर्वात कठीण काळ सुरु होणार आहे. या काळात तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याच प्रकारे अपशब्द काढू नका जेणेकरुन नंतर तुम्हाला त्याचा पश्चात्ताप होईल. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :