Shani Dev : 2025 आधी 'या' 5 राशींना शनी करणार मालामाल; शश राजयोगामुळे मिळेल चिक्कार लाभ
Shani Dev : 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करण्याआधी कुंभ राशीत शश राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रात शश राजयोगाला पंच महापुरुष राजयोग असे देखील म्हणतात.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हणतात. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच, 2025 मध्ये शनी आपली स्वराशी म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी 29 मार्च 2024 रोजी बृहस्पतीच्या मीन राशीत विराजमान होणार आहे.
2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करण्याआधी कुंभ राशीत शश राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रात शश राजयोगाला पंच महापुरुष राजयोग असे देखील म्हणतात. त्यामुळे याचा लाभ कोणत्या राशींना (Zodiac Signs) मिळणार ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या परिवर्तना दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. या राशीच्या दहाव्या चरणात शनी संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळेल. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या पंचम चरणात हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे, तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होताना दिसेल. तसेच, तुमच्या व्यापारात तुम्हाला चांगला नफा मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनी धनु राशीच्या तिसऱ्या चरणात आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या मुलाबाळांबद्दल तुम्हाला सतत चिंता जाणवत असल्यास त्या दूर होतील. संघर्षाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मात्र त्यासाठी तुम्ही खंबीर असाल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या दुसऱ्या चरणात शनी विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्ही जी काही इच्छा मागाल ती इच्छा तुमची पूर्ण होईल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. वैवाहिक जीवन चांगलं राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना 2024 चं वर्ष आणि 2025 चा सुरुवातीचा काळ फार चांगला असणार आहे. या दरम्ान तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची अनेक रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :