Shani Dev : नववर्ष 2024 मध्ये शनि चालणार वक्री चाल; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ, येणार चांगले दिवस
Shani 2024: शनीचे वर्णन कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून केले आहे. कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकते. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे.
![Shani Dev : नववर्ष 2024 मध्ये शनि चालणार वक्री चाल; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ, येणार चांगले दिवस Shani Dev 2024 shani situation saturn will go retrograde in 2024 these zodiacs will get lot of money due to shani vakri Shani Dev : नववर्ष 2024 मध्ये शनि चालणार वक्री चाल; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ, येणार चांगले दिवस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/f7d43c7eb319b6420fdab54bfcbc8edd1700963282122381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Margi : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी बदलतो. ग्रह मार्गक्रमणामध्ये शनि (Shani) हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनिदेव एका राशीत सर्वाधिक काळ राहतो. शनीच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. शनि सध्या कुंभ राशीत आहे आणि 2024 मध्येही शनि याच राशीत राहणार आहे.
पुढच्या वर्षी जूनमध्ये शनि वक्री स्थितीत जाईल. कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत तो या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या लोकांना चांगले दिवस येतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल. या राशींबद्दल जाणून घेऊया.
मिथुन (Gemini)
शनि वक्री झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. यासोबतच करिअरमध्ये प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकतं. अचानक आर्थिक लाभ झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला चांगला नफा मिळेल आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील.
सिंह (Leo)
शनीच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासोबतच भरघोस यश मिळू शकतं. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, नवीन वर्षात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.
तूळ (Libra)
तूळ राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे विशेष लाभ मिळू शकतो. पुढच्या वर्षी जूननंतर तुम्हाला प्रमोशनसह वेतनवाढ मिळू शकते. करिअरमध्ये येणाऱ्या अनेक समस्या संपुष्टात येऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev: नववर्ष 2024 च्या 'या' महिन्यापर्यंत 4 राशींना सुखाचे दिवस; शनिदेवाची राहणार कृपा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)